आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची प्रवक्ता बनली ही तरुणी, लोक म्हणाले 'बॉन्ड गर्ल'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारने संरक्षण मंत्रलयाच्या प्रवक्त्या पदी रोसियानाची निवड केली आहे. 26 वर्षीय रोसियाना मार्कोव्ह्सकाया एक पत्रकार आहे. रशियासह जगभरात रोसियानाची तुलना जेम्स बॉन्ड हॉलिवुडपट सिरीजची बॉन्ड गर्ल व्हेस्पा लिंड हिच्याशी केली जात आहे. कसिनो रोयाल (जेम्स बॉन्ड चित्रपट) मध्ये एव्हा ग्रीनने ही भूमिका साकारली होती. अभिनेत्री एव्हा ग्रीन आणि रोसियाना हुबेहूब एकसारख्याच दिसतात असे फॅन्स म्हणत आहेत. 

 

रोसियाना रशियन माध्यमात पत्रकार आणि अँकर आहे. तिने प्रामुख्याने वॉर आणि लष्कराचीच रिपोर्टिंग केली आहे. यापुढे थेट संरक्षण मंत्री सेरजी शोइगू यांना ती रिपोर्ट करणार असून पत्रकार परिषदांमध्ये रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा अधिकृत चेहरा राहणार आहे. रशियातच पत्रकारिता केलेल्या रोसियानाचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. आपली तुलना अभिनेत्री एव्हा ग्रीनशी केली जात असल्याचे तिलाही आवडते. इंस्टाग्रामवर तिने आपला आणि एव्हाचा फोटो जोडून पोस्ट देखील केला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या ग्लॅमरस प्रवक्त्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...