आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया: पुतीन यांच्या पक्षाच्या ग्लॅमरस महिला खासदाराला पतीने कारस्फोटात उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन खासदार ओकसाना - Divya Marathi
रशियन खासदार ओकसाना
मॉस्को - रशियातील सर्वात ग्लॅमरस महिला खासदार ओकसाना बोबरोवस्काया आणि त्यांच्या पतीचा एका कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. पोलिसांना कारमध्ये दोघांची सेमी नेकेड बॉडी आढळून आली. 30 वर्षांच्या ओकसाना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या यूनायटेड रशिया पक्षाच्या खासदार होत्या. त्यांचे पती निकिता बोबरोवस्काया मिलिटरी स्पेशल सर्व्हिसमधून निवृत्त झालेले होते.

रशियन वृत्तपत्र द सायबेरियन टाइम्सच्या वृत्तानुसार कारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री नोवोसिबिर्स्क शहरात स्फोट झाला होता. याच शहरातून ओकसाना खासदार होत्या. त्यांचा आणि त्यांच्या पतीचा मृतदेह कारच्या मागिलसीटवर आढळून आला. दोघांच्या अंगावर फार कमी कपडे होते. पोलिसांनी फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारावर सांगितले, की स्फोटाच्या आधी हे कपल सेक्स करत होते. सुरुवातीच्या तपासानुसार, महिला खासदाराच्या पतीनेच स्फोट घडवून आणला. त्याच्या हातात ग्रेनेड सापडला होता. महिला खासदारावर तिचा पती निकीता संशय घेत होता. त्याला संशय होता की ओकासानाचे रशियाच्या एका बड्या उद्योगपतीसोबत अफेअर सुरु आहे. कारमध्ये त्यांच्यात वाद देखिल झाला होता. मात्र तरीही ते एकमेकांजवळ आले आणि शारीरिक संबंधांदरम्यानच निकिताने ब्लास्ट केला.

कोण होती ओकसाना
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या यूनायटेड रशिया पक्षाच्या त्या खासदार होत्या.
- नोवोसिबिर्स्क शहरातून त्या विजयी झाल्या होत्या आणि एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचिय्या डिप्टी जनरल डायरेक्टर होत्या.
- रशियाच्या राजकारणात त्या प्रसिद्ध होत्या आणि सर्वात ग्लॅमरस खासदार म्हणून त्यांची ओळख होती.
- निकीता निवृत्त झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी एकट्या ओकसानावर पडल्यामुळे दोघांच्या संबंधात वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित अधिक फोटोज्...