आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glass And Steel Building Construction Technology

काच आणि स्टीलच्या भव्य इमारतींमधील छुपे तंत्रज्ञान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञानाच्या जगतातील सर्वात शक्तिशाली आणि संपन्न कंपन्या प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीची चुणूक दाखवत आहेत. ३० मार्चला फेसबुकचे कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने सांगितले की, कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क या कंपनीचे कार्यालय चार लाख ३३५५५ वर्ग फुटांच्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले होते, इमारत साधारण आहे. मात्र, त्यात भरपूर मोकळी जागा आहे. माहिती संकलनाचे काम कंपनीत चालते. कंपनीच्या अनुभवानुसार नवीन कल्पनांसाठी कर्मचार्‍यांमध्ये मोकळा संवाद फार महत्त्वाचा आहे.

इतर कंपन्याही मागे नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला, गुगलने आपल्या माउंटेन व्ह्यू, कॅलिफोर्निया कॅम्पस नव्याने बनवण्याची योजना आहे. काचेच्या विशाल छताखाली इमारतीला चार भागांत विभागले जाईल. सिमेंटची इमारत उभारण्यापेक्षा कंपनी हलकाफुलका साचा बनवू इच्छिते, ज्यात त्याच्या व्यवसायानुसार बदल घडवता येऊ शकतील. गुगल स्वयंचलित कार आणि मेडिकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उतरण्याच्या विचारात आहे. अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनचे असेच मोठे प्रोजेक्ट परंपरेपेक्षा वेगळे असल्याची झलक दाखवतात.

टेक कंपन्या पर्यावरण, नवीन कल्पना आणि कर्मचार्‍यांना आकर्षित करण्यासंदर्भात काम करतात. सिलिकॉन व्हॅलीच्या प्रगतीचे अध्ययन करणारी वाॅशिंग्टन विद्यापीठाच्या प्राध्यापिका मार्गारेट ओमारा म्हणतात की, टेक कंपन्यांचा विचार आहे की कार्यालय सुंदर असेल, तर कर्मचारी जास्त काम करतील आणि प्रसन्न राहतील. कंपन्यांच्या इतिहासातील हे एका वेगळ्या युगाचे संकेत असतील.

अत्याधुनिक आणि सुंदर स्थापत्याचा नमुना
अ‍ॅपल / कुपरटिनो, कॅलिफोर्निया
क्षेत्रफळ- २८ लाख घनफूट. चारमजली घुमटाकार इमारत २०१६ मध्ये पूर्ण होईल. त्यात १२००० कर्मचारी काम करू शकतील.
फेसबुक / मेनलो पार्क, कॅलिफोर्निया
क्षेत्रफळ - ४ लाख ३३५५५ घनफूट. फेसबुकची नवी इमारत. नऊ एकरमध्ये या इमारतीचे छत आणि पाऊण किलोमीटरचा पादचारी मार्ग आहे. हिरव्यागार छतावर ४०० झाडे असतील.
गुगल / माउंटेन व्ह्यू , कॅलिफोर्निया
क्षेत्रफळ - २५ लाख घनफूट. गुगल आपल्या कार्यालयाच्या परिसरात सायकल चालवण्यासाठी रस्ते बनवणार आहे. जवळपासच्या लोकांमध्ये संबंध दृढ करण्यासाठी रिटेल स्टोअर उघडण्यात येतील.