आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glimpse Of The Awesome Naval Power That Is The Uss Roosevelt

जगातील सर्वात मोठी युध्‍दनौका \'रुझवेल्ट\' करणार ISIS वर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4.5 एकर क्षेत्रफळ आणि 60 युध्‍दनौका असलेल्या 'यूएसएस थिओडोर रुझवेल्ट विमानवाहक जहाज
ब्रिटनच्या हॅम्पशायर समुद्रकिना-यावर छायाचित्रात दिसत असलेली युध्‍दनौका अमेरिकन नौदलाची ताकद दाखवत आहे. 4.5 एकर क्षेत्रफळ आणि 60 युध्‍दनौका असलेल्या 'यूएसएस थिओडोर रुझवेल्ट विमानवाहक जहाज काही आठवड्यांत सीरियातील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्याविरुध्‍द हवाई युध्‍दात सहभागी होणार आहे. रुझवेल्ट हा निमित्झ श्रेणीतील जहाज आहे. याचे ग्रुप कमांडर वुडी लेव्हिस यांचा या महाकाय युध्‍दनौकेवर पूर्ण विश्‍वास आहे. या युध्‍दनौकेला अमेरिकेचे 26 वे अध्‍यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांचे नाव देण्‍यात आले आहे. जहाजामध्‍ये एक वस्तूसंग्रहालयही आहे. यात रुझवेल्ट यांनी वापरलेल्या वस्तू ठेवण्‍यात आल्या आहेत.

'यूएसएस थ‍िओडोर रुझवेल्ट'चे वैशिष्‍ट्ये
- जहाजमध्‍ये खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. ती 90 दिवस पुरेल अशी आहे. तसेच 4 लाख गॅलन ताजे पाण्‍याची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
- महिला आणि पुरुषांसाठी स्वातंत्र राहण्‍याची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
- या विमान वाहू जहाजला 'बिग स्टिक' असे नावेही आहे.
- हे जहाज एकाच वेळी 1 लाख टनापेक्षा जास्त पाणी बाजूला करते.
- जहाजमध्‍ये 4 लाख गॅलन समुद्राचे पाणी पिण्‍यायोग्य बनवण्‍यात येते.
- जहाजमध्‍ये 5 हजार 600 लोक सहभागी आहेत. यात 3 हजार 200 नाविक आणि 2 हजार 480 हवाई कर्मचारी आहेत.
- जहाजावर दोन 'सी स्पॅरो' मिसाइल बसवण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील महाकाय युध्‍दनौका रुझवेल्टचे काही छायाचित्रे...