आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणप्रश्नी ट्रम्प एकाकी, मित्र राष्ट्रांनीही अमेरिकेची साथ सोडली; असा आहे वाद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविषयी नवीन रणनीती जाहीर केली आहे. अमेरिकेच्या काँग्रेसने इराणवर नवे निर्बंध लागू केले नाहीत तर इराणसोबतचे सर्व अणुकरार रद्द केले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्यावरून देशांतर्गत पातळीवर ट्रम्प टीकेचे धनी ठरले आहेत.  २०१५ मधील हा करार रद्द करण्याचा ट्रम्प यांना निर्णय आंतरराष्ट्रीय संकट निर्माण करणारा ठरत आहे, अशी टीका माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केली आहे. 

अमेरिका-इराण यांच्यात २०१५ मध्ये अणुकरार झाला होता. तो रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे  अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसह निकटच्या सहकारी राष्ट्रांना देखील धोका उत्पन्न होणार आहे. अनेक खासदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. हा ठराव मंजूर झाल्यास त्याचे वाईट परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. 
 
ट्रम्प म्हणाले,  आण्विक धोका ठरू देणार नाही 
इराणला आण्विक धोका ठरू देणार नाही. अणुकराराचा मसुदा काँग्रेसकडे पाठवत आहे. त्यात काही बदल करावा किंवा नाही, याबाबत सहकाऱ्यांकडून सल्ला घेतला जाईल. मृत्यू, विनाश, अराजकता पसरवण्याचे काम इराण करत आहे. इराण आण्विक कराराचे योग्यरित्या पालन करत नाही. परंतु त्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इराण लाभ घेत आहे. नवीन रणनीतीद्वारे ही समस्या दूर केली जाईल. करारानुसार कोणत्याही क्षणी अमेरिका करारातून बाहेर पडू शकते. तसा अधिकार करारात देण्यात आला आहे. 
 
अण्वस्त्र निगराणीत इराण सहकार्य करत आहे : आयएईए 
इराणवर ट्रम्प यांच्या आरोपानंतर आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (आयएईए) २०१५ मधील कराराचे इराण तंतोतंत पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयएइएचे संचालक युकिया अमानो म्हणाले, इराण सहकार्य करत आहे. मात्र आयएईएच्या अधिकाऱ्यांना अण्वस्त्रांपर्यंत जाऊ दिले जात नसल्याचा कांगाव ट्रम्प यांनी केला होता. 
 
ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची माहितीच नाही : रुहानी 
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी म्हणाले, आमच्या देशाच्या विरोधात ट्रम्प आक्रमक धोरण बाळगतात. ट्रम्प यांच्या विरोधामुळे अमेरिका एकाकी पडली आहे. ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची जाण नाही. एखादा राष्ट्राध्यक्ष बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय करार एकट्याच्या पातळीवर रद्दबातल ठरवू शकतो का, असा प्रश्नही रुहानी यांनी विचारला. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहेत कराराच्या अटी आणि ट्रम्प यांची स्वाक्षरी किती महत्वाची...
बातम्या आणखी आहेत...