आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळला, शेतीसाठी मिळाली नवी जमीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुक (ग्रीनलंड)- ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील देशांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे आर्क्टिक सर्कलमध्ये असलेल्या ग्रीनलंडला ग्लोबल वॉर्मिंगमुळे फायदा होत आहे.

जगाच्या तापमानात वार्षिक ०.७ अंश सेल्सियसने वाढ होत आहे, तर ग्रीनलंडचे तापमान १.५ अंश सेल्सियसच्या दराने वाढत आहे. त्यामुळे ग्रीनलंडमध्ये बर्फ वितळल्यामुळे कृषी जमीन उपलब्ध झाली आहे. परिवहनाचे नवे मार्ग उघडले आहेत. माशांच्या नव्या प्रजाती विकसित झाल्या आहेत. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स नावाच्या एका नियतकालिकात प्रकाशित अहवालानुसार, ५६ हजार लोकसंख्येच्या ग्रीनलंडमध्ये २०११ ते २०१४ दरम्यान एक ट्रिलियन टन बर्फ वितळला आहे. ग्रीनलंडला होत असलेला फायदा पाहता तेथील लोकांनी देशाने पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडावे, अशी मागणी केली.

>आधी होती बटाट्याची शेती, आता कोबी, गाजरामुळे फायदा : बर्फवितळल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्त जमीन मिळत आहे. ग्रीनलंडमध्ये जमिनीत आतापर्यंत बटाट्याशिवाय काहीच पिकत नव्हते. आता तेथे गाजर, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि ब्रोकोलीसारख्या भाज्या-फळेही पिकत आहेत.
>नवे रस्ते उघडल्याने पर्यटक वाढले, पर्यटन उद्योगाला फायदा : ग्रीनलंडमध्येबर्फ वितळल्याने नवे रस्ते खुले झाले आहेत. त्यामुळे चीन आणि आशियासह अनेक देशांत पोहोचणे सोपे होईल. या रस्ते मार्गांमुळे उद्योगासह पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या नव्या संधी आहेत.
ग्रीनलंड झिंगा माशांचा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश आहे. त्याला स्थानिक लोक गुलाबी सोनेही म्हणतात. पण काही वर्षांपासून तापमान वाढल्यानंतर ग्रीनलंडमध्ये अनेक नव्या प्रजातींचे मासेही मिळत आहेत. त्यात अटलांटिक ब्लुफीन आणि मेकेरील यांचा समावेश आहे. २०११ च्या आधी ते कधीच येेथे मिळाले नाहीत. तापमान वाढल्याने हे मासे ग्रीनलंडमध्ये आढळत आहेत, असे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मेकेरील माशाच्या किमती २०१२ पासून वाढत आहेत. ग्रीनलंडमध्ये २०१५ मध्ये ८० हजार टन मेकेरील मासे पकडण्यात आले होते. त्यामुळे ग्रीनलंडची सरकारी कंपनी रॉयल ग्रीनलंड आणि देशाची सर्वात मोठी खासगी कंपनी पोलर सी फूडला मोठा नफा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...