लंडन- ब्रिटनमध्ये गॉडवरुन अनोखी चर्चा सुरु झाली आहे. गॉडला पुरुष म्हणावे की महिला यावर मतभेद झाले आहेत. त्याला 'ही' म्हणावे की 'शी' असा या मागचा प्रयत्न आहे. ब्रिटनमधील महिला धर्मगुरुंनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर गेल्या रविवारी आर्चबिशप यांच्या घरी बैठकही झाली. प्रार्थनेतील भाषा बदलण्यात यावी. यात गॉडला 'ही' म्हणण्यात आले आहे. त्या ठिकाणी 'शी' असा उच्चार करण्यात यावा. यामुळे महिलांना समान दर्जा मिळेल. बुक ऑफ कॉमन प्रेयरला पितृसत्तात्मक असे सांगण्यात आले आहे.
गॉडसाठी केवळ 'ही' लिहिल्याने महिलांमध्ये दुबळेपणाची भावना निर्माण होत आहे, असे या महिला धर्मगुरुंनी म्हटले आहे. यासंदर्भात ऑक्सफोर्डच्या ट्रिनिटी कॉलेजची महिला धर्मगुरु एमा पर्सी म्हणाल्या, की गॉडचा उल्लेख करताना पुरुषासाठी वापरली जाते तशी भाषा वापरण्यात आली आहे. त्यामुळे गॉड पुरुष आणि पुरुष गॉड असे वाटतात. म्हणजेच महिला गॉडचे प्रतिनिधित्व करु शकत नाहीत.
वूमन अॅंड चर्च (वॉच) नावाच्या संघटनेची पर्सी सदस्य आहे. याच संघटनेनी ही चर्चा सुरु केली आहे. याची दुसरी सदस्य रेव्ह जोडी स्टोवेल या मताशी सहमत आहे. चर्च ऑफ इंग्लंडने पहिल्यांदाच रेल लिबी लेनला पहिली महिला बिशप केले होते. त्यानंतर आणखी दोन महिला बिशप झाल्या. त्यानंतर हा मुद्दा समोर आला आहे. ब्रिटनमध्ये पहिली महिला धर्मगुरु 1994 मध्ये झाली होती. वॉचची अध्यक्ष हिलरी कोटन हिलाही वाटते, की गॉडला 'शी' म्हणायला हवे.
भारतातही उपस्थित झालाय हा मुद्दा
यापूर्वी भारतात माहिती अधिकारात विचारण्यात आले होते, की गॉड कोण आहे. गॉडचे नाव घेऊन खासदार आणि आमदार शपथ घेतात. याला उत्तर देताना कायदा मंत्रालयाने सांगितले होते, की घटनेत इश्वराची व्याख्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्तर देता येणार नाही.