आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Apologizes After Photos App Tags Black Couple As Gorillas

PHOTOS:गुगलने कृष्‍णवर्णीय जोडप्याला संबोधले गोरिला, वाद पेटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो अॅपमध्‍ये कृष्‍णवर्णीय जोडप्या( लाल वर्तुळात) गोरिला असे संबोधले होते. - Divya Marathi
फोटो अॅपमध्‍ये कृष्‍णवर्णीय जोडप्या( लाल वर्तुळात) गोरिला असे संबोधले होते.
वॉशिंग्टन - गुगल फोटोज अॅपच्या सॉफ्टवेअरने एक कृष्‍णवर्णीय जोडप्याला गोरिला म्हटले आहे. या चुकीमुळे गुगलने माफी मागितली आहे. गुगलच्या इमेज रेकग्निशन साफ्टवेअरने त्या जोडप्याला गोरिलाचे लेबल लावून टॅग केले होते. या चुकीची न्यूयॉर्कच्या सॉफ्टवेअर डेव्हलपरने लक्ष वेधले होते. यानंतर सोशल मीडियावर गुगलच्या निषेधाचा नारा गर्जू लागला. सॉफ्टवेअर डेव्हलपर जॅकी अलसाइनने संदेशात म्हटले, माझा मित्र गोरिला नाही. या प्रकरणाविषयी गुगलने माध्‍यमांना मेल केला. त्यात म्हटले, आम्ही या घटनेने खूप दुखी आहोत. त्यामुळे माफ करावे. भविष्‍यात अशा घटना होणार नाही, या करिता आवश्‍यक ती पावले उचलली जाणार आहे. ऑटोमॅटिक इमेज लेबलिंगवर आम्हाला खूप काम करावे लागणार आहे, असे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले.

पूर्वी श्‍वानांना अश्‍व सांगितले होते
गुगल फोटोजने पूर्वीही चुका केल्या आहेत. आयटेक पोस्टच्‍यानुसार, मे मध्‍ये श्‍वानांच्या छायांचित्रांवर घोडे लिहून टॅग करण्‍यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि गुगलच्या मुख्‍य आर्किटेक्टने चुकीवर दिलेले ट्विट...