आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने भारतामध्येच सर्च केले अापले सुंदर सीईअाे: ३०५ कोटींचे पॅकेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- गुगलने सोमवारी रात्री दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. भारतात जन्मलेले सुंदर पिचाई जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत. आयआयटीत शिकलेले ४३ वर्षीय पिचाई हे कंपनीत आतापर्यंत वरिष्ठ उपाध्यक्ष होते. दुसरीकडे, गुगलने अल्फाबेट इंक ही नवी कंपनी स्थापली अाहे. या नव्या कंपनीअंतर्गत गुगल सर्च इंजिन काम करणार आहे.
चेन्नईत जन्मलेल्या सुंदर पिचाई यांनी खरगपूर आयआयटीतून बी.टेक. केलेले आहे. ते २००४ मध्ये गुगलच्या उत्पादन विभागात उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले होते.
गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आणि क्रोम ब्राऊझरच्या विकास करणाऱ्या टीमचे त्यांनी नेतृत्व केले.

ट्विटरने २०११ मध्ये पिचाई यांना नोकरीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, गुगलने तब्बल ५० दशलक्ष डॉलरचे (३०५ कोटी रुपये) पॅकेज देऊन त्यांना बाहेर जाण्यापासून थांबवले होते.