कॅलिफोर्निया - लोकप्रिय सर्च इंजिन
गुगलने डुडलची
आपली परंपरा कायम राखत मंगळवारी शोध पत्रकारितेच्या जनक निले ब्लाय या पत्रकार महिलेचे डुडल तयार केले आहे. डुडलच्या माध्यमातून १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. गुगलच्या वतीने ब्लाय यांची माहिती देणारी छोटीशी चित्रफितही तयार करण्यात आली आहे.
गुगलच्या वतीने डुडलमध्ये एक काल्पनिक वृत्तपत्र तयार करण्यात आले असून आपल्या ५७ वर्षांच्या आयुष्यात निले ब्लाय यांनी केलेल्या कार्याचा आढावा यात घेण्यात आला आहे. शोत पत्रकारितेबरोबरच नागरी समस्यांवरही ब्लाय यांनी नेहमी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे ज्या काळात महिलांना कुटुंबाबाहेरील विषयांवर बोलण्यास बंदी होती अशा काळात ब्लाय त्यांनी गरीब आणि पीडितांबाबत बातम्या लिहिल्या. एक उद्योगपती, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ब्लाय यांची ओळख होती.