आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केला प्लॅटफॉर्म, कोणताही कर्मचारी करू शकेल तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - बहुतेक कंपन्यांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यावर  अन्याय होत असेल, तो लिंगभेद, विनयभंग किंवा पक्षापती वागणुकीसह वंशभेदाचा बळी ठरत असेल तर त्याची तक्रार एचआर विभागाकडे केली जाते. मात्र, गूगलमध्ये अशा तक्रारींसाठी कंपनीने वेगळी खास सेवा सुरू केली आहे. ‘एस एट गूगल’ असे या सेवेचे नाव असून ही विकली सेवा आहे. या माध्यमातून गूगल आणि तिच्या सहकारी कंपन्यातील कोणताही कर्मचारी तक्रार करू शकतो. हा  मेल कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आपोआप मिळतो.
 
ज्या कर्मचाऱ्यांनी ही सेवा घेतली आहे त्यांच्यानुसार, ‘एस एट गूगल’ कंपनीच्या कामात पारदर्शकता असावी म्हणून अगोदर कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांची माहिती घेते. जे कर्मचारी आपले नाव देऊ इच्छित नाहीत त्यांना कंपनीच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगितले जाते. ही सेवा गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. आतापर्यंत कंपनीच्या ३ हजार म्हणजे २०% कर्मचाऱ्यांनी ही सेवा सबस्क्राईब केली आहे. गूगलच्या व्यवस्थापनानुसार कंपनीचे नाव टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

गूगलच्या प्रवक्त्यांनुसार, ‘कर्मचाऱ्यांकडे आपल्याकडील काही नकारात्मक आणि सकारात्मक बाबी मांडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पाऊल त्याचाच एक भाग आहे. कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी अत्यंत गांभीर्याने घेतल्या जातात. याची पोहोच कर्मचाऱ्यांना दिली जाते.’ कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची कंपनीच्या वतीने सुनावणी होते. अनेक कर्मचाऱ्यांनी या माध्यमाचा चेष्टेचा विषय म्हणून वापर केला हा भाग निराळा. एका व्यवस्थापकाने एचआरवर चेष्टेत चक्क बलात्काराचा आरोप केला होता. एका बहाद्दराने लिहिले होते की, ‘मला एका इंजिनिअरने एका ग्रुपसोबत ड्रिंकसाठी बोलावले आहे...’ कंपनीने या ग्रुपचा शोध घेतला. परंतु असा ग्रुप अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.

सहा भारतीय स्टार्टअपची चौथ्या अॅक्सिलेटर कार्यक्रमासाठी निवड
गूगलने सहा भारतीय स्टार्टअपची कंपनीच्या चौथ्या अॅक्सिलेटर प्रोग्रॅमसाठी निवडले आहे. या कंपन्या आशिया, लॅटिन, अमेरिका, आफ्रिका आणि युरोपातील स्टार्टअपसोबत सन फ्रान्सिस्कोच्या गूगल डेव्हलपर्स लाँच पॅडशी जुलैमध्ये जोडले जातील.
बातम्या आणखी आहेत...