आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गूगल प्लस' ऑगस्टपासून बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन/ सॅन फ्रान्सिस्को - जगप्रसिद्ध सर्च इंजिन गूगलने आपले सोशल नेटवर्क "गूगल प्लस'ला निरोप देण्याची तयारी सुरू केली आहे. ऑगस्टपासून ते बंद करण्यात येणार अाहे. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटशी स्पर्धा म्हणून चार वर्षांपूर्वी गूगल प्लस सुरू करण्यात आले होते. मात्र, याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

गूगल प्लसमार्फत दिल्या जाणा-या सेवांचे विभाजन करून त्याचे वेगवेगळे भाग केले जात असून सोमवारी ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गूगल प्लस आता दोन भागांत नव्याने लोकांसमोर येईल. यातील पहिला भाग व्हिडिओ स्ट्रिमिंगचा तर दुसरा फोटोंसाठी असेल. गूगलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ च्या अखेरीस गूगल प्लसचे ३० कोटी अॅक्टिव्ह यूजर होते. डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्टोन टेम्पल कन्सलटिंगनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये गूगल प्लसच्या अॅक्टिव्ह युजरची संख्या केवळ ११.१ कोटी राहिली आहे. त्यामुळे कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.