आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये वयोवृद्धांना पुरस्कार देते सरकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान सरकार काही वर्षांपूर्वीपर्यंत शंभर वर्षांपेक्षा अधिक जगणाऱ्यांना चांदीचा संस्मरणीय पुरस्कार देत होते. इतकी वर्षे जगणारे खूप कमी लोक असल्याने हा सन्मान करण्यात येत होता. हा पुरस्कार मिळणे अभिमानाचे समजले जात होते. जनगणनेच्या अहवालानुसार, मागील काही वर्षांत जपानमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. शंभरी पार करणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे. १९६३ पासून सरकार अशा लोकांना सातत्याने चांदीचे सेकअप (साकाजुकी) भेट देत आले आहे. यासाठी ४१०० खर्च येतो. मागील वर्षी सरकारने शंभरी पार करणाऱ्या २९ हजार लोकांना पुरस्कार देण्यासाठी १३.२३ कोटींची तरतूद केली होती. योजना सुरू झाली त्या वर्षी केवळ १५३ जण होते. ही रक्कम देणे शक्य होणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- पुरस्कार योजना पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही, परंतु कमी रकमेचा पुरस्कार देण्यात यावा, असे सरकारला वाटते. वयोवृद्धांची संख्या वाढत आहे, असा जपान एकमेव देश आहे. १९७१ पासून यात सातत्याने वाढ होत आहे.
japantimes.co.jp