आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS लग्नासाठी येथे बळजबरी पळवल्या जातात तरुणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरीदाला विवाहासाठी गळ घालताना ताइजेबेक आणि त्याचे नातेवाईक. - Divya Marathi
फरीदाला विवाहासाठी गळ घालताना ताइजेबेक आणि त्याचे नातेवाईक.
अनेक देशांमध्ये विवाहासाठीची 'अला काछू' ही परंपरा किर्गिस्तानमध्ये डोकेदुखी ठरत आहे. अला काछू म्हणजेच मुलींना पळवून त्यांच्याशी विवाह करणे. या पंरपरेने या देशात भयावह रुप धारण केले आहे. एकेकाळी दोन्ही बाजुच्या लोकांच्या मर्जीने ही परंपरा पाळली जात होती. पण आता या ठिकाणी तरुणीच्या कुटुंबीयांशी चर्चा न करताच मुली पळवल्या जातात. देशात 1994 पासून हा प्रकार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. तरीही दरवर्षी सुमारे 8 हजाराहून अधिक मुली याला बळी पडतात. येथे होणाऱ्या विवाहांपैकी दोन तृतीयांश विवाह मुलींना पळवूनच होतात.

परंपरेचे भयावह रुप
मानवाधिकार कार्यकर्ते इल्या लुकाश यांच्या मते, ही परंपरा आजही अनेक देशांमध्ये आहे. पण किर्गिस्तानमध्ये तिचे भयावब रुप समोर येत आहे. येथे पाच पैकी एक मुलगी केवळ मौज मस्ती म्हणून पळवली जाते. त्याच त्या मुलीच्या इच्छेचा विचारही केला जात नाही. अनेकदा तर पळवून नेणारे मुलीच्या ओळखीचेही नसतात. किर्गिस्तानच्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या मते पळवून नेल्या जाणाऱ्या बहुतांश मुलींना मारहाण केली जाते. 80 टक्के मुलींनी बळजबरी लग्न करावे लागते तर 20 टक्के मुली पळून जाण्यात यशस्वी होतात.
(पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा देशांच्या दौ-यादरम्यान किर्गिस्तानलाही गेले होते.)

अशी सुरू झाली परंपरा
अभ्यासकांच्या मते किर्गिस्तानमध्ये एकेकाळी अला काछू ही परंपरा केवळ गरूब कुटुंबांमध्ये होती. विशेषतः ज्यांना हुंडा देणे शक्य नसेल अशा लोकांमध्ये. तसेच चांगल्या कुटुंबातील अशी मुले ज्यांना गरीब मुलींशी विवाह करायचा असेल ते या परंपरेचा वापर करायचे. पळवून विवाहाला सामाजिक मान्यता मिळवून देण्याचा हा एक पर्याय होता. पण त्यावेळी दोन्ही कुटुंबांना मुली पळवण्यापासून विवाहापर्यंत पूर्ण माहिती असायची. तसेच ते यासाठी तयारही असायचे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, किर्गिस्तानमध्ये ब्राइड किडनॅपिंग प्रकरणाशी संबंधित काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...