आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 व्या वर्षी आजीने दिला नातीला जन्म, मुलीसमोरच झाली डिलेव्हरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 वर्षांच्या अॅलिस होहेनहॉज हिला वयाच्या चौथ्या वर्षीच ल्युकेमिया झाला होता. त्यामुळे ती आई बनू शकत नव्हती. तरीही 23 व्या वर्षी ती गर्भवती राहिली. पण 15 आठवड्यांमध्येच तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. कॉम्प्लिकेशन्समुळे ती आई बनू शकत नव्हती असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण अॅलिसची आई बनण्याची इच्छा तिच्या आईने पूर्ण केली. तिची आई थेरेसाने सेरोगेसीद्वारे अॅलिसच्या मुलीला जन्म दिला. 
 
चार मुलांची आई.. 
- हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडमधील इपस्विचचे आहे. थेरेसा ही चार मुलांची आई आहे. 
- थेरेसा सांगतात, मला वाटले होते माझे वय जास्त आहे त्यामुळे अॅलिस याला परवानगी देणार नाही. दोन वर्षांपूर्वी जणू मी तिला गमावले होते. त्यामुळे तिचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा होता. 
- हा संपूर्ण अनुभव अमेझिंग होता. प्रेग्नंसीबाबत समजताच मुलगी आणि मी खूप रडले होते, असे त्या सांगतात. 
- थेरेसाने सांगितले, हा माझ्या संपूर्ण आयुष्याचा सर्वात चांगला अनुभव होता. या वयात डिलिव्हरी पेनमध्ये मला कसे पाहणार याची अॅलिसला भिती वाटत होती. पण आमच्यासाठी हा क्षण खास होता. 
- डिलिव्हरीचे हे फोटो सेलेना रोलेसन नावाच्या फोटोग्राफरने क्लिक केले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डिलिव्हरीचे PHOTOS 
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...