आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grandfather Of ISIS \'Jihadi Junior\' Begs Daughter To Bring Grandson Home

माझा नातू माझ्या ताब्यात दे, ISIS मध्ये गेलेल्या मुलीकडे बापाचे आर्जव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेस डेयर हिचा चार वर्षांचा मुलगा. व्हिडीओमध्ये हा मुलगा जेहादी म्हणून दाखवण्यात आला आहे. - Divya Marathi
ग्रेस डेयर हिचा चार वर्षांचा मुलगा. व्हिडीओमध्ये हा मुलगा जेहादी म्हणून दाखवण्यात आला आहे.
लंडन - ISIS ने काही दिवसांपूर्वी चार वर्षांचा एक मुलगा जिहादी असल्याचे दर्शवणारा व्हिडीओ जारी केला होता. पण आता या मुलाच्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आजोबाने आपल्या मुलीकडे नातवाला परत ताब्यात देणयाची मागणी केली आहे.

आई आहे ISIS फायटर...
- जेहादी ज्युनियर म्हणून दाखवण्यात आलेल्या मुलाच्या आईचे नाव ग्रेस डेयर आहे.
- ग्रेस 2012 मध्ये लंडन सोडून पतिबरोबर सिरियात गेली होती.
- ग्रेस आण तिच्या पतीने ISIS जॉइन केले होते. तिचा पती मारला गेला आहे.
- ग्रेसने तिचे नाव बदलून खादिजा डेयर केले आहे.

संपूर्ण प्रकरण...
- ISIS या दहशतवादी संघटनेने पाच जणांच्या हत्येचा प्रोपगंडा व्हिडीओ जारी केला आहे.
- त्यात मारलेले लोक हे हेर असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ रक्कामध्ये शूट करण्यात आला आहे.
- 10 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये चार वर्षांचा मुलगाही दाखवण्यात आला आहे. तो जेहादी ज्युनियर असल्याचे सांगण्यात आले आहे.
- हा मुलगा गैर मुस्लीमांना ठार मारण्याची धमकी देताना दिसत आहे. त्याचे उच्चार हे ब्रिटीश आहेत.

आजोबाचे आर्जव...
- ग्रेसचे वडील आणि जेहादी ज्युनियर म्हटल्या जाणाऱ्यटा मुलाच्या आजोबाचे नाव संडे डेयर आहे. ते लंडनमध्ये राहतात.
- व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मुलीला नातवासह घरी परतण्याची विनंती केली होती.
- त्यांनी ग्रेसचे ISIS मध्ये सहभागी होणे चुकीचे ठरवले आहे. ग्रेसमुळे कुटुंबाची मान शरमेने खाली गेल्याचे ते म्हणाले आहेत.

ग्रेस बनली सेलिब्रिटी...
- ब्रिटिश आणि यूएस होस्टेजचे शीर कापून ISIS ची पहिली महिला फायटर बनण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ग्रेस सेलिब्रिटी बनली आहे.
- ब्रिटिश इंटलिजन्सच्या मते ती ISIS मध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रोल मॉडेल बनली आहे.
- द मिररने 2014 मध्ये एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात डेयर एके-47 चालवत अशल्याचे दाखवले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्रेस डेयर आणि तिच्या पतीचा फोटो...