आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतासह २३ देशांच्या लोकांना व्हिसा नको’, ग्रॅसलेंची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारत आणि चीनसह २३ देशांच्या नागरिकांना व्हिसा देणे बंद करा, अशी मागणी अमेरिकन सिनेटच्या न्यायिक समितीचे अध्यक्ष चक ग्रॅसले यांनी ओबामा प्रशासनाकडे केली आहे. हे देश अमेरिकेतून अवैध नागरिकांना परत घेण्यासाठी सहकार्य करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

ग्रॅसले हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ सिनेटर आहेत. त्यांनी याबाबत अंतर्गत सुरक्षामंत्री जे. जॉन्सन यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, रोज हजारो शस्त्रांसह धोकादायक गुन्हेगारांना सोडले जात आहे. पण त्यांना आपल्या देशात परत घेण्यासाठी कोणीही सहकार्य करत नाही. २०१५ या एका वर्षातच या हट्टी देशांच्या निर्णयामुळे तसेच असहकार्यामुळे अमेरिकेत २,१६६ लोकांना सोडण्यात आले. गेल्या वर्षांत ६१०० पेक्षा जास्त लोकांना सोडण्यात आले. देशात काही वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत.

अमेरिकन काँग्रेसने ही समस्या सोडवण्यासाठी इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व अधिनियमातील कलम २४३ (डी) लागू केले होते, अशी आठवण ग्रॅसले यांनी करून दिली आहे. त्यानुसार, गृह सुरक्षा विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर परराष्ट्रमंत्री त्या देशाच्या लोकांना प्रवासी किंवा अप्रवासी व्हिसा देणे बंद करते. या कलमाचा वापर एकदा २००१ मध्ये गुयानाच्या प्रकरणात करण्यात आला होता. त्यामुळे दोन महिन्यांतच ही समस्या निकाली निघाली होती.

२३ देशांकडून सहकार्य मिळत नाही
ग्रॅसले म्हणाले की, सध्या अमेरिकेने २३ देशांना असहकार्य करणारे म्हणून घोषित केले आहे. त्यातील पहिल्या पाच देशांत क्युबा, चीन, सोमालिया, भारत आणि घाना यांचा समावेश आहे. त्याशिवाय अमेरिकेचा प्रवासी आणि अबकारी प्रवर्तन कर विभाग इतर ६२ देशांवर लक्ष ठेवून आहे. या देशांकडून सहकार्य मिळण्यात अडचणी येत आहेत, पण आतापर्यंत त्यांना असहयोगी असे जाहीर करण्यात आले नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले ग्रॅसले...
बातम्या आणखी आहेत...