आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : युरोझोनमध्येच राहणार ग्रीस, संसदेचे एकमत, बाहेर हिंसक आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीसच्या संसदेबाहेर आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. - Divya Marathi
ग्रीसच्या संसदेबाहेर आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकले.
अथेन्स - ग्रीसच्या खासदारांनी युरोपीय संघाच्या अत्यंत कठोर अटी असलेल्या बेलआऊटला मंजुरी दिली आहे. प्रस्तावित अटींबाबत संसदेत चांगलाच गदारोळ झाला. युरोपीय युनियनच्या या कठोर अटी मान्य नाहीत. पण त्याशिवाय दुसरा पर्यायही नसल्याचे ग्रीसचे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी वोटिंगदरम्यान पुन्हा एकदा स्पष्ट केले. ग्रीसच्या संसदेत गुरुवारी सकाळी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) झालेल्या वोटिंगमध्ये युरो झोनमध्ये राहण्याच्या बाजुने 229 खासदारांनी मतदान केले. तर विरोधात मतदान करणारे केवळ 64 खासदार होते.

काय म्हणाले, सिप्रास
ग्रीसचे पंतप्रधान सिप्रास यांनी संसदेतील भाषणात म्हटले की, युरो जोनमध्ये राहणे आणि त्यासाठी त्यांच्या कठोर अटी मान्य करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. जर तुम्ही मला पाठिंबा दिला नाही, तर मला पंतप्रधानपदी राहणे कठीण होईल. ग्रीसला युरोपीय युनियन 86 अब्ज युरोची मदत देत आहे. पण त्यासाठी कठोर अटी ठेवण्यात आल्या आहेत.

संसदेच्या बाहेर हिंसाचार
ग्रीसच्या संसदेत जेव्हा या मुद्यावर मतदान सुरू होते त्यावेळी संसदेबाहेर बेलआऊट पॅकेजच्या अटींच्या मुद्यावरून हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

बेलआऊट पॅकेजच्या अटी
ग्रीसला युरोझोनकडून बेलआउट पॅकेज (ऑस्टेरिटी बिल) हवे असेल तर संसदेला अनेक नव्या नियमांना मंजुरी द्यावी लागेल. तशी मंजुरीही देण्यात आली आहे. आता ग्रीसमध्ये सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करावे लागणार आहेत. तसेच सामान्य जनतेवर कराचा बोझाही चांगलाच वाढणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा. ग्रीसच्या संसदेबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनाचे PHOTOS