आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Greeces Condition Worse Than Sudan Can Face Recession This Year

ग्रीसने पुन्हा मागितले 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज, सुदानपेक्षा वाईट अवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ग्रीसमध्ये रविवारी पाच जुलैला जनमत चाचणीसाठी तयार करण्‍यात आलेले बॅलेट बॉक्स)

अथेन्स- इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या (आयएमएफ) कर्जाचा हप्ता देण्यासाठी ग्रीसकडे 12 हजार कोटी रुपये नाहीत. विशेष म्हणजे कर्जाच्या हप्त्याची अंतिम मुदतही संपली असताना ग्रीसला अाणखी कर्ज हवे आहे. त्यामुळे ग्रीसची अवस्था आफ्रिकेतील कर्जबाजारी देश सुदानपेक्षाही वाईट झाली आहे.

ग्रीसचे पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीसने आयएमएफकडे
आणखी 2.21 लाख कोटी रुपये कर्ज मागितले आहे. देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या कर्जाच्या रकमेतून देशाच्या आर्थिक गरज पूर्ण होईल. तसेच कर्जाचा हप्ता चुकता करण्यास मदत होईल. आम्हाला आणखी दोन वर्षे मुदत द्या, असे यापूर्वी ग्रीसचे अर्थमंत्री यानिस वारुफाकिस यांनी म्हटले होते. मात्र, आयएमएफने ग्रीसच्या दिवाळखोरीची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली होती.

दुसरीकडे, युरोपियन संघातील देशांच्या अर्थमंत्र्यांनी ग्रीसच्या नव्या मागणीवर विचार करण्यास सहमती दर्शवली आहे. ग्रीस युरोझोनमध्ये कायम राहाण्यासाठी युरोपियन युनियनमधील देशांनी तयारी दर्शवली आहे. परंतु, ग्रीस आता एक मोठा कर्जबाजारी देश बनला आहे. आयएमएफच्या इतिहासात ग्रीस हा सगळ्यात मोठा डिफॉल्टर देश ठरला. ग्रीसने आयएमएफला सगळ्यात मोठ्या कर्जाचा हप्ता देऊ शकत नसल्याचे सांगून हात वर केले आहे. त्यामुळी ग्रीसची आर्थिक अवस्था आफ्रिकेतील सुदान देशापेक्षाही बिकट झाली आहे. गृहयुद्धात होरपळलेल्या सुदानवर आयएमएफचे 8843.8 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सन 1980 मध्ये सुदान हे कर्ज घेतले होते.

... तरीही आयएमएफने ग्रीसला संबोधले नाही 'डिफॉल्टर'
कर्जाचा हप्ता भरू शकणार नसल्याचे सांगत हात वर करणार्‍या ग्रीसला आयएमएफने अजूनही 'डिफॉल्टर' घोषीत केलेले नाही. आयएमएफने ग्रीससाठी तांत्रिकदृष्ट्या 'ग्रीस इन एरियर्स' सारख्या शब्दाचा वापर केला आहे.
'ग्रीससाठी यंदाचे वर्ष महामंदीचे...
ग्रीसने दोन वर्षींसाठी आणखी कर्जाची मागणी केली आहे. पाच वर्षांत ग्रीसवर तिसर्‍यांदा ही परिस्थिती ओढवली आहे. रेटिंग एजन्सीजने ग्रीसच्या रेटिंगमध्ये प्रचंड घट दिसून आल्याचे म्हटले आहे. परिणामी ग्रीससाठी यंदाचे वर्ष आर्थिक महामंदीचे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सीने ग्रीसला थोडा दिलासा दिला आहे. तो म्हणजे ग्रीसला 'डिफॉल्टर' संबोधलेले नाही.

ग्रीसमध्ये पाच जुलैला जनमत चाचणी
ग्रीसवर आयएमएफचे दीड अब्ज युरोचे कर्ज आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचे पॅकेज नाकारले होते. मात्र, आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. ग्रीसच्या पंतप्रधानांनी देशाला मिळणाऱ्या प्रस्तावित मदत पॅकेजवर जनमत चाचणी घ्यायचे ठरवले आहे. ही जनमत चाचणी 5 जुलैला होणार असून पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, या आर्थिक संकटाचा ग्रीस झालेला परिणाम