आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीकच्या तटरक्षक दलाकडून १,४१७ स्थलांतरितांची सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काॅस ग्रीक- ग्रीक तटरक्षक दलाने गेल्या ३ दिवसांत शोध मोहीम राबवून १ हजार ४१७ स्थलांतरितांची सुटका केली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूर्व एजियन समुद्रात ६० शोध मोहिमा तट रक्षक दलाद्वारे राबविण्यात आल्या.ग्रीसजवळील बेटांवर अवैध मार्गाने स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यासाठी ही माेहीम हाती घेण्यात आल्याचे तट रक्षक दलाच्या सूत्रांनी सांगितले. सिरिया व अफगाणिस्थानातील राजकीय अस्थैर्यामुळे, तुर्कीश सागरी मार्गाने अनेक स्थलांतरित ग्रीसजवळील बेटांवर आश्रयासाठी येत आहेत. त्याला अटकाव करण्यासाठी ग्रीस तटरक्षक दलाने शोधमोहिमा हाती घेतल्या आहेत.

सिरियातील निर्वासित सुरक्षेच्या शोधात ग्रीसच्या भूमीवर
ग्रीकच्या ताब्यातील बेटावर सिरियातील निर्वासितांचे लोंढे दाखल होऊ लागले आहेत. दहशतवाद, हिंसाचारामुळे जीव मुठीत घेऊन हजाराे नागरिक कुटुंबकबिल्यासह तुर्कीमार्गे पोहाेचू लागले आहेत. अनेक बेकायदा मार्गाने येत आहेत.

१,२४, ०००
निर्वासित यावर्षी ग्रीसमध्ये दाखल.