आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीकांनी धुडकावल्या युरोपच्या कर्जफेडीच्या अटी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकाल लागताच ग्रीसच्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला. बाइक काढली आणि पत्नीसोबत निघून गेले! - Divya Marathi
निकाल लागताच ग्रीसच्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला. बाइक काढली आणि पत्नीसोबत निघून गेले!
अथेन्स/लंडन - ग्रीसमध्ये झालेल्या जनमत चाचणीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ग्रीकांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व युराेपीय देशांच्या कर्जफेडीच्या अटी फेटाळून लावल्या. 62.5% मतदान झाले. यात 61.31% नी अटी नाकारल्या. सिप्रास सरकारही तरले.

तरी सावट कायम....
>युरोझोनची मंगळवारी ब्रुसेल्समध्ये तातडीची बैठक आहे.त्यात ग्रीसशी संबंधांबाबत सर्व देश निर्णय घेतील.
>युरोपीय देशांची कठोर भूमिका कायम. जर्मनीने म्हटले, आता चर्चेला कोणताही आधार नाही.
>ग्रीसने चर्चा पुढे नेण्यासाठी संवादक युक्लिडला अर्थमंत्री केले.
>बँका बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. एटीएममधून ४२०० रुपयेच काढता येतील.
>वृत्तपत्रांकडे बातम्या छापण्यासाठी फक्त रविवारपर्यंतचाच कागद उरला आहे.

पण चांगली बातमीही
ग्रीसने मागितली तर मदतीची तयारी; अशी नाणेनिधीप्रमुखांची ग्वाही
रुपयावर थोडा परिणाम : सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम म्हणाले, संकट दीर्घकाळ चालेल. रुपयाला फटका बसू शकतो. पुरेशी विदेशी गंगाजळी आहे. काही डाॅलर देशाच्या बाहेर जाऊ शकतात.

युरोपीय देश चर्चेत सहभागी करून घेऊ इच्छित नसल्याचे मला सांगण्यात आले. मी नसल्यास मदत मिळेल असे पंतप्रधानांना वाटते. म्हणून मी राजीनामा दिला.’ - यानिस वारुफाकिस, माजी अर्थमंत्री