गेल्या वर्षी २५ एप्रिलला आलेल्या भूकंपामुळे नेपाळमधील बारपक, मांदरे लाप्राक ही गावे उद्ध्वस्त झाली होती. भूकंपाचे केंद्र बारपकच होते. नेपाळच्या सर्वात मोठ्या दुर्घटनेनंतर एक वर्षाने या तीन गावांची स्थिती जाणण्यासाठी ‘दिव्य मराठी’चा नेपाळहून वृत्तांत.
कधीकाळी पर्यटकांचे आकर्षण असलेली मातीची घरे उद्ध्वस्त
बारपक
स्टोन स्लेटचा गोरखा बारपकला जोडणाऱ्या रस्त्याचे रूपांतर उखडलेल्या डोंगराच्या पायदळ वाटेत झाले आहे. गोरखा काठमांडूपासून १४५ किमी अंतरावर आहे. या रस्त्यावरून दिवसभरात फक्त चार बस धावतात. एक बारपकहून काठमांडूला, दुसरी बारपकहून गोरखाला. याच मार्गावरील दोन बस परततात. त्याशिवाय काही ट्रॅक्टर सिमेंट आणि इतर साहित्य घेऊन जातात. एनजीओ आणि सरकारच्या बाय चाकांच्या काही गाड्याही जातात. सोबत भूकंपात उद्ध्वस्त होत असलेले
आपले घर पाहिलेले दोघे होते. त्यांनी कुटुंबीय गमावले होते. गोरखाहून बारपककडे गाडीच्या बाजूला किमीपर्यंत नदी होती. चाकांपेक्षा मोठे दगड रस्त्यावर. रस्ता चढणीचा. पर्वतांच्या उंचीपेक्षा दुप्पट खोल असलेल्या दरीतून गाडी पुढे निघाली होती. तासांत ६० किमी पोहोचवणाऱ्या रस्त्यावर धुळीचे लोट एवढे की आपलीच गाडी दिसत नव्हती.
बारपक बसस्थानकात पोहोचल्यावर मातीत माखलेल्या मुलांनी ‘नमस्ते’ म्हणत स्वागत केले. भूकंपाने त्यांचे फक्त घरच घरच नव्हे, तर लहानपणही हिरावले. गेल्या वर्षी २५ एप्रिलला आलेल्या भूकंपाचे केंद्र बारपकच होते. तेव्हापासून ते जागतिक नकाशावर आले. बारपकमध्ये १३८० घरे होती. काँक्रीटची ३० ते ४० घरे वगळता सर्व घरे कोसळली. बारपकमध्ये पर्यटक माती दगडांनी बांधलेली घरे पाहण्यासाठी येत असत. आधी काँक्रीटचे घर बांधले की ज्येष्ठ नागरिक नाराज होत. भूकंपात फक्त सिमेंटची घरे वाचली, त्यामुळे ज्येष्ठही आता तशीच घरे बांधण्याचा सल्ला देत आहेत. ‘बारपक इन’ नावाचे हॉटेल चालवणारे रामबहादूर गुरुंग यांनाही आपल्या काँक्रीटच्या हॉटेलवर विश्वास आहे. ते म्हणतात, ७-८ भूकंप पाहिले आहेत. येथेच बसा, सुरक्षित राहाल.
गावातील संतामाया तेव्हा महिन्यांची गर्भवती होती. घराच्या ढिगाऱ्याखाली चार तास तिचा पाय अडकला होता. गर्भातील मुलावरही परिणाम झाला. जन्माच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर जखमेची खूण होती. तेव्हा २२ वर्षीय गम्या गुरुंगही गर्भवती होती. भूकंपात पतीचा मृत्यू झाला तेव्हा सासरच्यांनी गम्यालाच दोष दिला. तिला घराबाहेर हाकलले. आता ती ११ महिन्यांच्या मुलासह भाड्याच्या घरात राहते. मुलगा आणि पतीच्या मृत्यूचे दु:ख फुलदाणी घानी सहन करू शकली नाही. आपल्याजवळ काहीच शिल्लक राहिल्याने ती मनोरुग्ण झाली. कांची गुरुंग तर अनेक दिवस शेजाऱ्यांना म्हणायची, ‘चला, आपण सर्व जण सोबतच मरू.’ एक वर्षात या गावात लग्नं झाली, पण कुठेही आनंदोत्सव नव्हता. भूकंप झाल्यानंतर सुखराम गुरुंग धावत घराबाहेर पडले, पण शेजाऱ्याच्या घराचा ढिगारा अंगावर पडला. त्यांना एअरलिफ्ट करून पोखरात नेण्यात आले. त्यांचा एक हात कापावा लागला. उपचार करून परतले तेव्हा जुन्या घरात गेलेच नाहीत. बसस्थानकाजवळ छोटे दुकान उघडले आहे. दोन हात होते तेव्हा लवकर काम करत होतो, आता इतरांची मदत घ्यावी लागते, अशी खंत ते व्यक्त करतात. भारतीय लष्करातून निवृत्त झालेले ८५ वर्षीय सुभेदार जयराम गुरुंग मेडिकल कोअरमध्ये होते. आता ग्रामस्थांसाठी छोटा दवाखाना चालवतात. ते म्हणतात, मी पाकिस्तानसोबत युद्ध लढलो आहे, पण गेल्या वर्षभरापासून एवढा घाबरलो आहे ती रात्री झोपच येत नाही. त्यांचे घर काँक्रीटचे असल्याने सुरक्षित राहिले. पण ते महिनाभर शेतात तंबूत झोपत होते.
पडक्या घरात ते राहू शकत नाहीत, गाव डेंजर झोनमध्ये
मांदरे
भूकंपानंतर मांदरे गावातील ६५ घरांत राहणाऱ्या लोकांना गाव रिकामे करावे लागले. आता हे गाव डेंजर झोन घोषित करण्यात आले आहे. भूकंपात अनेकांची घरे पडली. आता नव्या घरासाठी त्यांना जमीनदाराला १५०० रुपये महिना भाडे द्यावे लागते. ज्यांना भाडे देता येत नाही ते आपल्या जुन्या पडक्या घरात परतले आहेत. त्या जुन्या घरांच्या जवळ जमिनीत खोल खड्डा पडला आहे. पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका असतो. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांची कबर घराच्या ढिगाऱ्याजवळच आहे. मुलांची शाळा होती, ती बंद झाली आहे. भूकंपाने या मुलांना वेगळाच धडा दिला आहे. मुले आता दूरच्या शाळेत शिकायला जाण्याऐवजी पडलेली घरे पुन्हा बांधण्याच्या कामात मदत करत आहेत.
एकही घर शाबूत नाही, आता बर्फात तंबू ठोकून उपजीविका
लाप्राक
लाप्राकमधील लोक ताडपत्री आणि टिन यांचा वापर करून नवे घर उभारत आहेत. १७०० मीटर उंचीवर असलेल्या लाप्राकमध्ये ६२४ घरे होती. भूकंपात एकही वाचले नाही. नाइलाजाने पूर्ण गावच २८०० मीटर उंचीवर हलवण्यात आले. ते जेथे राहत असत तेथे बर्फवृष्टी होत नसे. पण गेल्या हिवाळ्यात त्यांनी पहिल्यांदा बर्फवृष्टीचा अनुभव घेतला. तोही तात्पुरत्या घरांत आणि तंबूत राहून. भूकंप आला तेव्हा लष्करी हेलिकॉप्टरही येथे पोहोचू शकले नाही. दोनदा प्रयत्न करण्यात आला, पण खराब हवामान आणि पावसामुळे परवानगी मिळाली नाही. उद्ध्वस्त गावाचा जगाशी संपर्कच नव्हता. किती नुकसान झाले, लोक कोणत्या स्थितीत आहेत याचा जगाला पत्ताच नव्हता. रस्ता असा होता की तेथे वाहन येणेही अशक्य होते. लष्कर चार दिवसांनंतर येथे पोहोचले होते. त्यानंतर मदतकार्य सुरू होऊ शकले.