आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची वाढती महत्त्वाकांक्षा रोखणे हेच मोदी-ट्रम्प यांच्या जवळीकतेचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर इतक्या उत्साहात भेटले आणि एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. तथापि, प्रशंसेच्या या मुखवट्यामागे भारत-अमेरिका संबंधातील अनेक जटिल बाबी दडलेल्या आहेत. ट्रम्प प्रशासन भारतातील अनेक अनिश्चिततेवर लक्ष ठेवून आहे. त्यांचे व्यापार आणि इमिग्रेशन धोरण आणि पॅरिस जलवायू करारातून माघार घेण्याच्या पद्धतीमुळे भारताच्या चिंता वाढलेल्या आहेत. 
 
सध्या भारत आणि अमेरिकी नेते एकत्र येण्यामागे चीनच्या समुद्र क्षेत्रातील वाढत्या महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहेत. मोदी यांच्या भेटीपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने भारताला २२ सर्व्हिलान्स ड्रोन विकण्यास मंजुरी दिली. यावर चिनी माध्यमांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी हिंद महासागरातील नौदलाच्या संयुक्त सरावाबाबत सांगितले. या सरावात जपान, भारत आणि अमेरिकेच्या युद्धपोत सहभागी होतील. लष्करी सहकार्याबाबत भारत नेहमीच सावध पवित्रा बाळगून असतो. पण, दोन्ही देशांनी चीनचा समुद्री विस्तार संतुलित करण्यासाठी नौदल नेटवर्कच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. एका प्रस्तावात दक्षिण चीन समुद्रातील संयुक्त नौदल गस्तीचाही समावेश आहे.  

या भेटीत चांगल्या संबंधांचे संंकेत मिळाले
न्यूयॉर्क टाइम्सने पॉलिटिकल सायंटिस्टच्या हवाल्याने म्हटले आहे की, मोदी आणि ट्रम्प यांची भेट अपेक्षेपेक्षाही चांगली ठरली. भारतीय उच्चायुक्त राजीव डोगरा यांच्या मते, या भेटीबाबत काही लोक चिंतित होते, परंतु ट्रम्प यांनी भारतासोबत राहण्यासाठी आपल्या पद्धतीने मार्ग काढला. ट्रम्प यांच्याशिवाय अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया सतत मोदींसोबत चालत होत्या. हे भारतासाठी महत्त्वपूर्ण संकेत आहेत.

न्यूयॉर्क टाइम्स
न्यूयॉर्क टाइम्सने व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने लिहिले की, दोन्ही नेत्यांचा आत्मियता भाव हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना दाखवण्यासाठी होता. कारण, ट्रम्प चीनवर आधीपासूनच नाराज आहेत. जिनपिंग उत्तर कोरियातील क्षेपणास्त्र कार्यक्रम रोखण्यात असमर्थ ठरले आहेत. ट्रम्प सरकार भारताला २२ ड्रोन विकणार आहे. याचा उपयोग भारताकडून हिंद महासागरात चीनची हेरगिरी करण्यासाठी केला जाऊ शकतो. दुसरीकडे, चीनप्रती भारताच्या मनातही प्रचंड संशय आहे. शी जिनपिंग यांच्या ओबीओआर प्रकल्पावर भारताने अनेक आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे चीनशी स्पर्धा करण्यासाठी मोदींना ट्रम्पकडून प्रशंसेची अपेक्षा आहे.

ग्लोबल टाइम्स   
ग्लोबल टाइम्सने अमेरिकेची थिंकटँक मानल्या जाणाऱ्या अटलांटिक कौन्सिलच्या एका दस्तएेवजाच्या हवाल्याने लिहिले आहे की, बीजिंगचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी वॉशिंग्टनला नवी दिल्लीची गरज असेल. यात भारताने अभिमान करावा असे काहीच नाही. अमेरिका आणि भारताला चीनच्या उदयाबाबत चिंता आहे. अमेरिकेने चीनवर दबाव वाढवण्यासाठी भारताशी सख्य वाढवले आहे. चीनला घेरण्यासाठी अमेरिकेच्या रणनीतीचा भाग बनणे भारताच्या हिताचे नाही. याचे विनाशकारी परिणामही होऊ शकतात. चीनशी चांगले संबंध ठेवल्यास भारतासाठी फायद्याचे ठरू शकते, असेही ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे.  

वर्ल्ड मीडिया  
वॉशिंग्टन पोस्ट : कोणतेही प्रश्न विचारू नये, असे पत्रकार परिषदेपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. पॅरिस कराराबाबत काहीच चर्चा झाली नाही.
  
डॉन : मोदी आणि ट्रम्प यांनी मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारली. तुमच्या भूमीत दहशतवादाला आश्रय दिला जाऊ नये, असे ट्रम्प यांनी पाकिस्तानला या वेळी बजावले.  
 
टाइम मॅगझिन: भविष्यात दोन्ही देशांचे संबंध चांगले असतील, असे संकेत मिळाले आहेत. पण, दोन्ही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.  

द इंडिपेंडंट: जागतिक नेत्यांप्रमाणेच ट्रम्प यांची भेटही सौदा, कराराशी संबंधितच असते. भारताशी लष्करी सहकार्यावर चर्चा झाली आणि संरक्षण करारही केले.   
 
आणि...चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी माध्यमातील प्रतिक्रिया: भारताने अमेरिकेच्या हातचे बाहुले होऊ नये, चीनशी मैत्रीच भारतासाठी फायद्याची ठरेल

दिव्य मराठी एक्स्पर्ट: चीन-पाक-रशिया युती रोखण्यासाठी भारत-अमेरिकेची साथ गरजेची  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत अमेरिकेच्या एका वर्तमानपत्राने ‘अमेरिका फर्स्ट मीट्स इंडिया फर्स्ट’ मथळ्याखाली एक अहवाल दिला. हे दोन शब्द भारताने बनवलेली प्रतिमा आणि प्रभाव विशद करण्यास पुरेसे आहेत. वास्तविक अमेरिकेच्या प्रशासकाचा दृष्टिकोन अस्पष्ट असून त्याचा फायदा आशियात चीन घेत आहे. तिकडे पाकिस्तान चीनचा प्रामाणिक सैनिक आहे. त्यास चीन “ऑल व्हेदर फ्रेंड’ म्हणतो. त्यामुळे चिनी वर्चस्वाचा पाकलाही फायदा होत आहे. आता रशिया त्यांच्यासोबत आल्याने ही युती मॉस्को-बीजिंग-इस्लामाबाद त्रिकुटात परावर्तित झाली आहे. ही भारतासाठी अत्यंत विपरीत स्थिती आहे. अमेरिकेची साथ मिळणार नाही तोपर्यंत भारत या तिघांसोबत सक्षम सौदेबाजी करू शकणार नाही. या भेटीने सध्या संक्रमण समाप्तीचे संकेत देऊन टाकले आहेत. या भेटीतील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय नौदलासाठी २२ गार्झियन ड्रोन खरेदीचा सौदा पक्का झाला. त्यामुळे अमेरिका भारतासाठी संरक्षणविषयक मोठा भागीदार असल्याचे िसद्ध झाले. भारतासाठी तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कुटनीतीच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि आर्थिकदृष्ट्या अन्य देशांचे मिळत असलेेले सहकार्य कमी करणे. यामुळे भारताविरोधातील दहशतवादाला आळा बसेल, अशी भारताला अपेक्षा आहे.
- रहिस सिंह, परराष्ट्र प्रकरणांचे तज्ज्ञ  
बातम्या आणखी आहेत...