आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulf Country Deported 3 For Reason Of Relationship With ISIS

ISIS साठी काम करणाऱ्या तिघांना केले डिपोर्ट, NIA चौकशी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
नवी दिल्ली - ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून तीन भारतीयांना गल्फ कंट्रीमधून डिपोर्ट करण्यात आले आहे. एनआयएच्या सुत्रांच्या मते, लवकरच त्यांची चौकशी होणार आहे.

असे करायचे काम...
- सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनेशी संलग्न होण्यासाठी तरुणांना आकर्षित करणे, तरुणांना भरती करणे या प्रकरणात भारतात आणि परदेशांत यांचा शोध सुरू होता.
- शेख अझहर अल इस्लाम अब्दुल सत्तार शेख, मोहम्मद फरहान रफीक शेख आणि अदनान हुसेन अशी यांची नावे समोर आली आहेत.
- हे सर्व आबूधाबी मॉड्यूलमध्ये IS साठी काम करायचे असे सांगितले जाते.
- NIA च्या सुत्रांच्या मते, यांच्या चौकशीनंतर त्यांच्या अटकेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी यूएईनेही केले होते डिपोर्ट
- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात युनायटेड अरब अमिरात (युएई) ने दोन भारतीयांना डिपोर्ट केले होते.
- त्यांच्यावर ISIS च्या धोरणाचे समर्थन केल्याचा आरोप आहे.
- सौदीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सद्वारे ही माहिती शोधली.
- यापूर्वी यूएईमध्ये 4 सप्टेंबर 2015 रोजी 11 भारतीयांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यावर दहशतवादी संघटनेसाठ प्रपोगंडा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप होता.