आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उज्बेकच्या क्रूर हुकुमशहाच्या मॉडेल मुलीची हत्या! पित्यानेच ठेवले होते नजरकैदेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा... - Divya Marathi
उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा...
इंटरनॅशनल डेस्क- आशियाई देश उज्बेकिस्तानमधील सर्वात चर्चित चेहरा म्हणजेच माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांची मुलगी गुलनारा हिची हत्या केल्याचे वृत्त पुढे आले आहे. सेंट्रल एशियन न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, उज्बेक नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिस (एसएनबी)च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गुलनाराला विष देऊन मारण्यात आले आहे. वेबसाईटच्या दाव्यानुसार, गेल्या 5 नोव्हेंबर रोजी उज्बेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये गुलनाराचा मृत्यू झाला. पित्याच्या मृत्यूनंतर मेंटल हॉस्पिटलमध्ये होती गुलनारा....

- गुलनाराचे पिता करीमोव यांचा 2 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
- त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून नजरकैदेत असलेली गुलनारावर उज्बेकिस्तानच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
- गुलनाराला सध्याचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्जियोव यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.
- या मागे कारण होते की, इस्लाम करीमोव यांच्या मृत्यूनंतर गुलनारा हीच राष्ट्राध्यक्षपदाची प्रबळ दावेदार होती.
- त्याचमुळे आपल्या सत्तेला धोका नको म्हणून शौकत यांनी गुलनाराला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.
सोवियत यूनियनची सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक होती गुलनारा-
- गुलनारा एके काळी सोवियत यूनियनमधील सर्वात श्रीमंत महिलांच्या टॉप टेन लिस्टमध्ये होती.
- वर्ष 2000 मध्ये हार्वर्ड यूनिवर्सिटीत शिकायला गेल्यावर तिला परराष्ट्र विभागात सल्लागार बनवले होते.
- ती उज्बेकिस्तानची डेप्टी फॉरेन मिनिस्टर सुद्धा राहिली. यानंतर पॉप सिंगर बनून संपूर्ण देशात चमकली.
- गुलनारा इतकी सुंदर होती की, उज्बेकी लोग तिला ‘प्रिन्सेस गुलनारा’ म्हणायचे.
वर्षे 2013 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप-
- व्यावसायाने एक मॉडेल, पॉप सिंगर, रायटर आणि डिझायनर गुलनारावर वर्ष 2013 मध्ये 1 बिलियन डॉलर ( सुमारे 6707 कोटी रुपये) चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला.
- यासोबतच तिच्यावर स्कॅंडिनेवियन आणि रशियन टेलिकॉम कंपन्यांकडून मोठी रक्कम आणि शेयर घेतल्याचा आरोप लागला. पनामा पेपर लीक्समध्येही तिचे नाव समोर आले होते.
- यामुळेच तिचे वडिल इस्लाम करीमोव यांनी तिला दोन वर्षे नजरकैदेत ठेवले होते.
- गुलनाराचे लग्न 1991 मध्ये अमेरिकन बिजनेसमॅन मंसूर मक्सूदीसोबत झाले होते. मात्र, 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
- गुलनाराला दोन मुलांत मुलगा इस्लाम आणि मुलगी ईमान आहेत. हे दोघेही ब्रिटनमध्ये राहतात.
पित्याच्या राजवटीला मुलीकडूनच मिळाले होते आव्हान-
- जगातील एक क्रूर हुकुमशहाच्या यादीत उज्बेकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष इस्लाम करीमोव यांचे नाव होते.
- करीमोव 1991 ते 2016 पर्यंत उज्बेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष राहिले.
- करीमोव यांच्या क्रूर हुकुमशहा राजवटीच्या इतक्या काळात एकदाच आव्हान मिळाले ते ही आपल्याच गुलनारा या मुलीकडून.
- सुंदर गुलनारा उज्बेकिस्तानची फेमस मॉडेल आणि पॉप सिंगर सुद्धा राहिली.
- गुलनाराच्या वाईट दिवसाची सुरुवात तिच्याच पित्याच्या काळात झाली होती.
- याबाबत सांगितले जाते की, करीमोव यांनीच गुलनारावर खूप अत्याचार केले व शेवटी तिला दोन वर्षापासून नजरकैदेत ठेवले.
- करीमोव यांचा इतिहास क्रूरच राहिला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणीच बोलण्याची हिंमत नव्हती. अखेर करीमोवला मुलगी गुलनारानेच आव्हान दिले होते. आता दोघेही दोन महिन्याच्या काळाच्या आतच पडद्याआड गेले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आपल्या क्रूर पित्याला कधीकाळी आव्हान दिलेल्या व आता पडद्याआड गेलेल्या गुलनाराचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...