आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चमध्ये माजी वायुदल वैमानिकाकडून गोळीबार; 26 ठार 20 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन- अमेरिकेच्या टेक्सास येथील एका चर्चमध्ये रविवारी प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांवर माजी वायुदल वैमानिकाने रायफलने बेछूट गोळीबार केला. यात २६ जणांचा बळी गेला, तर २० जण जखमी झाले. या घटनेनंतर हल्लेखोरही मृतावस्थेत आढळला. पेंटागॉननुसार हल्लेखोराचे अतिरेकी संघटनेशी लागेबांधे नाहीत. काळा पेहराव केलेल्या माथेफिरूने रगर मिलिटल्री रायफलने हे हत्याकांड घडवले. सुथरलँड स्प्रिंग्ज येथील फर्स्ट बाप्तिस्ट चर्चमध्ये ही घटना घडली.
 
मृतांमध्ये गर्भवती महिलेचा समावेश
मृतांत गर्भवती महिला,चर्चच्या पास्टरच्या १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. बहूतांश मृत ५ ते ७२ वयाेगटातील अाहेत. हल्लेखोर हा गौरवर्णीय असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे होती.
 
हल्‍लेखोर अमेरिकेचा मा‍जी सैनिक
हल्‍लेखोर तरुण हा अमेरिका वायुदलाचा माजी सैनिक असल्‍याचे समोर आले आहे. 2014मध्‍ये त्‍याला सेवेतून निलंबित करण्‍यात आले होते. आपल्‍या पत्‍नी व मुलाचा छळ केल्‍या प्रकरणी त्‍याच्‍यावर कोर्टमार्शलची कारवाई करण्‍यात आली होती. 
 
प्रार्थनेवेळी उपस्थित होते 50 लोक 
- प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनूसार, हल्‍लेखोर चर्चमध्‍ये शिरला तेव्‍हा रविवारच्‍या प्रार्थनेसाठी 50हून अधिक लोक उपस्थित होते.
- हल्‍ल्‍यानंतर या परिसरात चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आल्‍याचे वृत्‍त एका टीव्‍ही चॅनेलने दिले आहे. या परिसरात मोठ्या संख्‍येने सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्‍यात आले आहे. 
- सेन एंटोनियोपासून 48 किमी दूर अंतरावरील सदरलँड स्प्रिंगची लोकसंख्‍या 400 आहे. 
 
जवळपास 50 राऊंड फायरिंगचे आवाज ऐकू आले 
- चर्चपासून काही अंतरावर असलेल्‍या एका दुकानमालकाने सांगितले की, 'सकाळी सर्व काही ठीक होते. त्‍यानंतर अचानक चर्चमधून गोळ्यांचा आवाज ऐकू आला. त्‍यानंतर जवळपास 50 राऊंड फायरिंगचे आवाज ऐकले.' 
 
ट्रम्‍प यांनी ट्विट करुन व्‍यक्‍त केला खेद
- अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी ट्विट करुन या घटनेबद्दल खेद व्‍यक्‍त केला आहे. ते म्‍हणाले, 'मी घटनेवर लक्ष ठेवून आहे. एफबीआय आणि इतर तपास संस्‍था घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.' ट्रम्‍प सध्‍या जपानच्‍या दौ-यावर आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...
 
 

 
बातम्या आणखी आहेत...