आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तंबूल :सांताक्लॉज बनून केला हल्ला; ३९ जणांचा मृत्यू, इस्तंबूलच्या नाइट क्लबमधील घटनेने तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तानबूलचे गव्हर्नल वासीप साहीन यांनी हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. - Divya Marathi
इस्तानबूलचे गव्हर्नल वासीप साहीन यांनी हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
इस्तंबूल- तुर्कीतील इस्तंबूलच्या एका नाइट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दोन हल्लेखाेरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १६ परदेशी नागरिकांसह ३९ जणांचा मृत्यू झाला. घटनेत सुमारे ७० जण जखमी झाले. हा देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्राध्यक्ष तैयिप एर्डोगन यांनी म्हटले आहे.

१० डिसेंबर रोजी इस्तंबूलमध्ये फुटबॉल सामन्यानंतर बॉम्बस्फोट झाला होता. त्यात ४४ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला आहे. तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान साेएलू म्हणाले, रिना नाइट क्लबमधील मृत्युमुखी पडलेल्या २१ जणांची आेळख पटली आहे. हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांनी क्लबच्या बाहेरील सुरक्षा रक्षकांची हत्या केली व त्यानंतर ते आतमध्ये घुसले होते. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना रात्री सुमारे सव्वाच्या सुमारास घडली. क्लबमध्ये ५०० ते ६०० लोक पार्टीत सहभागी झालेले होते.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर अनेक लोकांनी प्राण वाचवण्यासाठी क्लबमधील जलतरण तलावात उड्या मारल्या. सुटाबुटातील पुरुष, कॉकटेल ड्रेस परिधान केलेल्या महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. अनेक तरुणी तर भीतीने बेशुद्ध झाल्या. हल्लेखोर अरबी बोलत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. नाइट क्लबचे मालक मेहमत कोशार्सलान म्हणाले, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेद्वारे माहिती मिळाल्यानंतर १० दिवसांपूर्वी क्लबची सुरक्षा वाढवण्यात आली होती. हल्लेखोरांनी कलाशनिकोव्ह प्रकारातील रायफल आणली होती. रायफलने त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. 
 
पर्यावरणमंत्र्यांची हत्या, महिला अटकेत
बुजुंबुरा-
आफ्रिकन देश बुरुंडीच्या राजधानीमध्ये पर्यावरण मंत्री इमॅन्युअल नियोंकुरची हत्या करण्यात आली. ते नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घरी परतत असताना हा हल्ला झाला. त्यांच्यासोबत एक महिला होती. पोलिसांनी तिची झाडाझडती सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष पियरे एंकुरुजिजा २०१५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अनेक हत्या झाल्या. परंतु मंत्र्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.

रायफल घेऊन आला होता दहशतवादी 
- सीएनएन तुर्कच्या वृत्तानुसार ही फायरिंग शहरातील रिएना क्लबमध्ये झाली आहे. याठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी सुरू होती. 
- रात्री एक वाजेच्या सुमारास (भारतातील रात्रीचे 3) सँटाच्या ड्रेसमधील एका बंदुकधाऱ्याने रायफलद्वारे फायरिंग सुरू केले. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार या दहशतवाद्याने क्लबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांवरही फायरिंग केले. त्यानंतर क्लबमध्ये घुसून त्याने अंधाधुंद फायरिंग सुरू केले. 
- इस्तानबूलचे गव्हर्नल वासीप साहीन यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकूण 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस जवानाचाही समावेश आहे. 
- हल्ल्यानंतर सुमारे 40 ते 50 जणांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
- एनटीव्हीच्या रिपोर्टनुसार बंदुकधारी क्लबच्या आत असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार हल्ल्याच्या वेळी या क्लबमध्ये 700 ते 800 जण उपस्थित होते. 

इस्तानबूलचे गव्हर्नल म्हणाले दहशतवादी हल्ला 
- इस्तानबूलचे गव्हर्नर वासीप साहीन यांनी हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. 
- सशस्त्र पोलिस दलाने क्लबला घेरले असून अॅम्ब्युलन्सही पोहोचली असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. 
- घटनेनंतर पोलिसांनी जवळपास 2 किमीचा परिसर सील केला आहे. 

दिला होता हाय अलर्ट 
- काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनतर तुर्कस्तानात आधीच हाय अलर्ट होता. 
- त्यामुळेच नवीन वर्षाच्या स्वागताचत्या सोहळ्यादरम्यान फक्त इस्तानबूलमध्येच 17 हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. 
- यापूर्वी मार्च महिन्यात तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 37 जणांचा मृत्यू झाला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा,संबंधित PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...