आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gunmen Holding Up 10 People Inside Primark Store In Paris

Paris : ओलिसांवरील संकट टळले, सर्वांना वाचवण्यात पोलिसांना यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. - Divya Marathi
पोलिस ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पॅरिस -फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका स्टोअरमध्ये सुरू असलेले ओलिसनाट्य सुमारे तासभरानंतर संपले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेशल फोर्सने 18 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. मात्र बंदुकधारींना मारण्यात आले किंवा नाही याची मात्र काहीही माहिती मिळालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मॉलमध्ये दोन ते तीन शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी मॉलमधील प्रिमार्क नावाच्या एका स्टोअरमध्ये असलेल्या 10 जणांना ओलिस ठेवले होते. आत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्याच्या मित्राला एक मॅसेज केला. त्यात दोन शस्त्रधारी व्यक्तींनी बंधक बनवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनी हे स्टोअर असलेल्या क्वार्टझ् मॉलकडे जाणारी वाहतूक थांबवली. तसेच त्वरीत विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. गुन्हेगार चोरी करण्याच्या उद्देशाने आत गेले असा सुरुवातीचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO