आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#DHAKA: अतिरेक्यांनी खेळली रक्तरंजीत होळी; ISISने जारी केली हे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशची राजधानी ढाका येथे मुंबईतील 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. जहाल दहशतवादी संघटना ISIS च्या 10 अतिरेक्यांनी शुक्रवारी ढाक्यात अक्षरश: रक्तरंजीत होळी खेळली आहे. ISIS व अल कायदा या दोन्ही दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. ISISची न्यूज एजन्सी 'अमाक'ने रेस्तराँमधील काही रक्तरंजीत फोटो प्रसिद्ध केले आहेत. गुलशन डिप्लोमेटिक झोनमधील 'आर्टिसन बेकरी' रेस्तराँवर शुक्रवारी ISISच्या अतिरेक्यानी 40 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी कमांडोंना 12 ओलिसांना सोडवण्यात यश आले आहे. लष्कराने आतापर्यंत 6 अतिरेक्यांना कंठस्नान घातले असून एकाला जिवंत पकडले आहे. लष्कराचे ऑपलेशन सुरु असून इतर अतिरेक्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS च्या न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेले रेस्तराँच्या आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...