आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एच 1 बी’ व्हिसाधारकांना नोकरी करू देणार नाही : ट्रम्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन : एच१-बी व्हिसाधारकांना अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्याच्या संधी हिरावू देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. अमेरिकींच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्याला आपले प्राधान्य राहील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे हजारो भारतीयांच्या अमेरिकेतील नोकरीवर गदा येणार आहे. डिस्ने वर्ल्डसारख्या कंपन्यांत एच१-बी व्हिसाधारक परदेशींनी अमेरिकींच्या नोकऱ्या बळकावल्या. प्रत्येक अमेरिकीचे जीवन सुरक्षित व्हावे म्हणून मी संघर्ष करेन, असे ट्रम्प म्हणाले.
वॉल्ट डिस्नेविरुद्ध खटला
डिस्ने वर्ल्ड व इतर दोन आऊटसोर्सिंग कंपन्यांविरुद्ध दोन अमेरिकी कर्मचाऱ्यांनी संघराज्य कायद्यान्वये खटला दाखल केला. डिज्नेने २०१५ मध्ये २५० कर्मचारी काढले होते. त्यात लिओ परेरो व डिना मोर हे दोघे होते. त्यांनी एचसीएल इंक व कॉग्निजंट टेक्नॉलॉजीजलाही खटल्यात ओढले आहे.
बातम्या आणखी आहेत...