आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एच-१ बीमुळे भारत-अमेरिकेत तणाव शक्य, कंपन्यांसाठी कुशल कामगारांची कमतरता भासू शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- एच-१ बी व्हिसा मुद्द्याला अधिक हवा देण्याचा प्रयत्न झाल्यास भारत-अमेरिका यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो, असे मत अमेरिकेच्या भारतवंशीय माजी मंत्री निशा बिस्वाल यांनी म्हटले आहे.
 
अमेरिकेच्या नवीन धोरणाशी हजारो भारतीयांचे भविष्य जोडलेले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे. एच-१ बी व्हिसाच्या मुद्द्यावर सध्या विविध प्रकारचे कयास लावले जात आहेत. ही चर्चा उभय देशांत तणाव निर्माण करणारी ठरू शकते, असे बिस्वाल यांनी म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासनाने एच-१ बी व्हिसाबाबतचे धोरण कडक स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर बिस्वाल यांनी हे वक्तव्य केले आहे. व्हिसा संबंधी सहा विधेयकांना संसदेत मांडण्यात आले आहे. एच-१ बी व्हिसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अमेरिका व परदेशी कंपन्यांची गरज भागवली जाते. त्याचा दुरुपयोग रोखला जाणे आवश्यक आहे, असे बिस्वाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारत-अमेरिका यांच्यातील संबंध आणखी बळकट करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...