आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदी दौऱ्यानंतर' एच- 1 बी व्हिसाधारकांच्या वेतनात वाढ करण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे श्रममंत्री अलेक्झांडर अकोस्टा यांनी लोकप्रतिनिधी गृहाच्या समितीसमोर म्हटले की, एच-१ बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येणाऱ्यांमुळे अडचणी वाढत आहेत. हे अमेरिकनांची जागा घेतात. एच-१ बी व्हिसाधारकांचे वेतन वाढवले पाहिजे, असे अलेक्झांडर अकोस्टा म्हणाले. भारतीय आयटी कंपन्या अमेरिकेत एच-१ बी व्हिसाअंतर्गत व्यावसायिकांना नियुक्त करतात. सध्या एच-१ बी व्हिसाधारकांना ६० हजार डॉलर्स वेतन मिळते. यात वाढ करून ८० हजार डॉलर्स वेतन करावे अशी सूचना करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने एका धोरणाचा मसुदा जारी केला होता. संगणक प्रोग्रामर्स एच-१ बी व्हिसासाठी पात्र नसतील. 
 
इन्फोसिसचे धोरण
इन्फोसिसने अमेरिकेत व्हिसासाठी येणाऱ्या संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकाधिक अमेरिकनांना नियुक्तीचे धोरण कंपनीने अवलंबले आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. एच-१ बी व्हिसा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. याअंतर्गत अमेरिकन कंपन्या परदेशी तंत्रज्ञांना नियुक्त करू शकतात.   

अमेरिकी श्रममंत्र्यांची भूमिका...  
- अकोस्टा यांनी समितीसमोर म्हटले की, परदेशी नोकरदारांमुळे अडचणी येत आहेत. अमेरिकनांच्या जागा ते अडवतात.  
- काँग्रेसने एच-१ बी व्हिसाधारकांना मिळणाऱ्या ६० हजार डॉलर वेतनात कित्येक वर्षांत वाढ केली नाही. ही वाढ केल्यास अनेक लोक आपोआप देश सोडून जातील. कारण ते या सीमेच्या खाली येतात.   
- अमेरिकनांऐवजी परदेशी नागरिकांना संधी देण्याची काय आवश्यकता आहे ? हे वारंवार होत आहे.   
- अमेरिकेत वाढत्या बेरोजगारांची संख्या पाहता एच-१ बी व्हिसाचे नियम कडक करणे आवश्यक आहे.   
- परदेशी नागरिकांना संधी देतात. अमेेरिकनांना नोकरीला मुकावे लागते.  
- अमेरिकेतदेखील पात्र उमेदवार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. 

६ मुस्लिम देशांसाठी नवे व्हिसा धाेरण  
ट्रम्प प्रशासनाने ६ मुस्लिम देशांच्या अर्जकर्त्यांसाठी आणि निर्वासितांसाठी नव्या व्हिसा धोरणाची घोषणा केली आहे. यात अमेरिकेत स्थायिक कुटुंबीयांशी अथवा घनिष्ठ व्यापार संबंध या दोन प्रमुख पात्रता मानण्यात येतील. प्रशासनाचे हे नवे पाऊल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने पूर्वीचे धोरण बाद ठरवल्यावर आले आहे. पूर्वी ट्रम्प यांच्यावर मुस्लिमद्वेष्टे असण्याची टीका झाली होती.  अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना याविषयीचे दिशानिर्देश बुधवारी पाठवण्यात आले. यात अमेरिकेत पालक, अपत्ये, जोडीदार, जावई, भावंडे स्थायिक असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 

पेरूच्या अमेरिकी राजदूतपदी भारतवंशीय  
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकी कृष्णा आर. उर्स यांची पेरूचे अमेरिकी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकी राजनयिक सेवेमध्ये ते १९८६ पासून कार्यरत आहेत. सध्या कृष्णा हे स्पेनच्या माद्रिद येथे नियुक्त आहेत. ते उपराजनयिक म्हणून स्पेनमध्ये कार्यरत आहेत. उर्स हे आर्थिक धोरणांचे तज्ज्ञ असून त्यांनी आतापर्यंत ७ देशांमध्ये अमेरिकेचे दूत म्हणून काम केले आहे. त्यांचे इंग्रजीशिवाय स्पॅनिश, हिंदी, तेलुगूवर प्रभुत्व आहे.
बातम्या आणखी आहेत...