आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafiz Saeed Said India And Israel Are Within The Range Of Pakistan Nuclear Weapons

हाफिज सईदची धमकी, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या कक्षेत भारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या हाफिज सईद म्हणाला, नरेंद्र मोदी जम्मू-काश्मिरमध्ये आर्मीचे ऑफिसर्स बसवत आहे. त्याने नवाज सरकारवरही निशाणा साधला. हाफिज सईद मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

भारत आणि इस्त्रायल बाबत काय म्हणाला सईद
- शुक्रवारी लाहोरमधील एका रॅलीत जमात उद दावाचा प्रमुख म्हणाला, भारत आणि इस्त्रायल दोन्ही शत्रु राष्ट्र पाकिस्तानच्या आण्विक अस्त्रांच्या रेंजमध्ये आहेत.

आणखी काय म्हणाला, लष्करचा म्होरक्या
- सईद म्हणाला, नवाज शरीफ यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींसमोर देशाची सविस्तर माहिती ठेवली नाही.
- पठाणकोटवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे सईदने समर्थन केले. तो म्हणाला, पाकिस्तान सरकारने जैशच्या प्रमुखाला अटक करुन चूक केली आहे.
- हाफिज म्हणाला, पाकिस्तान सरकारने भारताला खूष करण्यासाठी जैशच्या सदस्यांना आणि इतर जिहादींना अटक केली आहे.

अझहरच्या अटकेने भारताचा विश्वास वाढेल
- सईद म्हणाला, अझहरच्या अटकेचे दुःख आहे. त्याची अटक ही मोदी सरकारला खूष करण्यासाठीची कारवाई आहे. यामुळे काश्मिर मुद्यावर भारताचा पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे.
- तो म्हणाला, काश्मिर मुद्यावर पाकिस्तानला दोन पावले मागे यावे लागेल. नवाज सरकार राष्ट्राच्या इच्छेकडे दुर्लक्ष करत आहे.
- सईद म्हणाला, सुषमा जेव्हा भारतात आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या अजेंड्यावर सहा मुद्दे होते. त्यातील तीन जमात-उद-दावाच्या संदर्भात होते.