आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदच्या मुलाने नावेदला दिले होते प्रशिक्षण, सहकारी होता \'लष्‍कर\'चा मुख्‍य गार्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - उधमपूरमध्‍ये बीएसएफच्या बसवर हल्ला करणा-या आणि आता कैदेत असलेला दहशतवादी मोहंमद नावेदची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(एनआयए) चौकशी करीत आहे . त्यात काही खळबळजनक खुलासे होत आहेत. तो म्हणाला, की मुंबई हल्ल्याचा मुख्‍य सूत्रधार लष्‍कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईदचा मुलगा तल्ला हाफीज सईदने मला प्रशिक्षण दिले होते. बीएसएफच्या हल्ल्यात मारला गेलेला साथिदार नोमान हाफीज सईदचा सिक्युरिटी गार्ड होता.
तल्ला हाफिज म्हणाला, काश्‍मीरमध्‍ये मुस्लिमांवर अत्याचार होतोय
जम्मूच्या मीरा साहिबमध्‍ये संयुक्त चौकशी केंद्रात एनआयएच्या चौकशी दरम्यान मोहंमद नावेदने सांगितले, की त्याला प्रशिक्षणात एके-47 सह अनेक ऑटोमॅटिक शस्त्रे चालवण्‍याचा आणि सुरुंग पेरण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. येथेच तल्ला हाफीज सईदने काश्‍मीरमध्‍ये मुस्लिमांवरील अत्याचार होत असल्याचे सांगितले होते. काश्मिरातील मुस्लिम कसे असुरक्षित आहेत याची माहिती दिली होती.

गुहेत काढले होते दिवस
उत्तर काश्‍मीरमधून भारतात घुसखोरी केलेल्या नावेदने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर लष्‍करच्या एका कमांडरची भेट घेतली होती. काही दिवस तो उत्तर काश्‍मीरमध्‍ये नोमानसह एका गुहेत राहिला. येथून दोघे ट्रकने मंगळवारी (ता. चार) उधमपूर येथे पोहोचले. त्यांनी एक रात्र पत्नीटॉपच्या जंगलातील एका मिशिदीत घालवली. दुस-या दिवशी सकाळी दहशतवादी हल्ला केला, असे त्याने एनआयएला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...