आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible ! लोक...येथे आग आणि तलवारींने केस कापतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेन : हेअर स्टाइलिस्ट बहुतेक वेळेस केस कापण्‍यासाठी कात्रीचा वापर करतात. मात्र स्पेनमध्‍ये एक असा हेअर स्टाइलिस्ट आहे जो लोकांच्या केसांना चांगल लूक देण्‍यासाठी तलवारींचा आणि आगीचा प्रयोग करतो. स्पेनच्या माद्रिद शहरातील हेअर स्टाइलिस्ट अल्बर्टो ओलमेडो तलवार, टॉर्च आणि लहान कात्र्यांच्या मदतीने लोकांची केस कापतो.
अल्बर्टो म्हणाला, की यात काय नवीन गोष्‍ट नाही. जुन्या काळी अशाच प्रकारे केस कापले जात होते. याने केस दोन्ही बाजूने एक सारखी कापली जातात. अल्बर्टो कधीही तिच ती हेअरकट करत नाही. तो नेहमी केशांच्या स्टाइलमध्‍ये नवनवे प्रयोग करीत असतो. आगीचा वापर केल्याने केस एक सारखी दिसायला मदत होते. ग्राहकाच्या परवानगीने अल्बर्टो ब्लो टॉर्चचा वापर करतो. त्याच्या केसकर्तनालयात येणा-या प्रत्येक माणसाला त्याचा कामाची त-हा आवडते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे आणि शेवटी पाहा व्हिडिओ..