आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

53 वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ; हैतीसह 7 देशांत इमरजन्सी, 877 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट-ओ-प्रिंस- कॅरेबियन देश हैतीमध्ये आलेल्या 'मॅथ्यू' चक्रीवादळाचा कहर अजूनही थांबलेला नाही. विध्वंसकारी चक्रीवादळाने आतापर्यंत 877 जणांचा बळी घेतला असून लाखो नागरिकांना बेघर केले आहे. 53 वर्षात अटलांटिक खंडातील हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.

हैती, क्यूबा, जमैका, डोमिनिकन रिपब्लिक, बहामास आणि अमेरिकेत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 4300 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. जवळपास 1.7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

जेरेमी शहर पूर्णपणे उद्ध्वस्त...
पेनिनसुला (प्रायद्वीप) मधील सर्वात महत्त्वाचे शहर जेरेमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जवळपास 80 टक्के घरे जमिनदोस्त झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दक्षिण भागात असलेल्या सूदमध्येही 30 हजार घरांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी प्रेसिडेंट इलेक्शन पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमेरिकेलाही चक्रीवादळाचा जबर फटका बसला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रशासनाने आणीबाणी घोषित केली आहे.
7 लाखांहून जास्त जनतेला मॅथ्यूचा फटका...
- मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी हे वादळ हैती आणि क्यूबाच्या सागरी किनार्‍यावर धडकले. ताशी 230 km वेगाचा वारा आणि त्यात वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले.
- मॅथ्यूमुळे 80 टक्क्यांहून जास्त नुकसान झाल्याचे हैतीच्या शासकीय सूत्रांनी यूएन ऑफिशियल्सच्या मीटिंगमध्ये सांगितले.
- देशातील तब्बल सात लाख लोकांना या समुद्री वादळाचा फटका बसला आहे. बहुतांश लोक ढिगार्‍याखाली गाडली गेली आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु झाले आहे.
- राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसमध्ये पूल कोसळ्ल्याने मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
- मॅथ्यूमुळे बहामास आणि डोमनिक रिपब्लिकला देखील नुकसान झाले आहे.

फ्लोरिडाकडे वळले चक्रीवादळ..
- चक्रीवादळ आता अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्याच्या दिशेने वळले आहे.
- फ्लोरिडाचे राज्यपाल रिक स्कॉट यांनी राज्यातील जनतेला सतर्क राहाण्यास सांगितले आहे.
- फ्लोरिडाच्या सागरी किणार्‍यावर 'मॅथ्यु' ताशी 205 Km वेगाने धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडामध्ये आणीबाणी घोषित केली आहे.

अमेरिकेत 30 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले...
- अमेरिकेतील फ्लोरिडा, मियामी आणि केप केनेवरलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. फ्लोरिडामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
- 6 लाख घरांमधील वीज गुल झाली आहे. तर काही भागात 38 सेमी पाऊस झाला आहे. समुद्रात 12 फूट उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.
- अमेरिकेची स्पेस एजन्सी 'नासा'ने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. केप केनवेरलमध्ये स्पेस लॉन्च साइटच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यूएस एअरफोर्सने देखील लढाऊ विमानांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
- चक्रीवादळावर नियंत्रण मिळवण्यासाठी केनेडी स्पेस सेंटच्या लॉन्च कंट्रोल सेंटरजवळ बंकरमध्ये 116 कर्मचार्‍यांची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.
- 'नासा'चे प्रवक्ते जॉर्ज डिलर यांनी एका ई-मेलमध्ये सांगितले आहे की, पहिल्यांदा एखादे भयावय चक्रीवादळ प्रचंड वेगात सागरीकिनार्‍यावर धडकणार असल्याचा इशारा मिळाला आहे.
- फ्लोरिडा, जॉर्जिया आणि साऊथ कॅरोलिनामधील बेघर झालेल्या लोकांसाठी शेल्टर्स सुरु करण्यात आले आहेत.


पुढील स्लाइड्‍सवर पाहा, चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या हैतीमधील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...