आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाम्दी जगातील सर्वात भव्य योगर्ट प्रकल्पाचे जनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ग्रीक योगर्ट कंपनी चोबानीचे संस्थापक हाम्दी उल्काया हे १९९४ मध्ये अमेरिकेत आले होते. इंग्रजी आणि बिझनेसचे शिक्षण घेण्यासाठी ते येथे आले. त्यांच्या तुर्कीच्या घरात मिळत तितके चवदार योगर्ट येथे मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. उल्काया यांनी आपल्या घरगुती पद्धतीने दही बनवणे सुरू केले.
 
 न्यूयॉर्क येथे २००५ मध्ये स्मॉल बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनकडून ८ लाख डॉलर्सचे कर्ज त्यांनी काढले. आजारी योगर्ट प्रकल्प अधिग्रहित केला. २ वर्षांतच त्यांचे दही लोकप्रिय झाले. आज कंपनीची वार्षिक उलाढाल १.५ अब्ज डॉलर्स आहे. २००७ मध्ये उल्कायाने चोबानीचे उत्पादन सुरू केले होते. कंपनीत १२०० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. 
 
उल्काया यांचे बालपण तुर्कीत गेले. लहानपणी कुटुंबाच्या डेअरी फार्मवर काम केले. राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. न्यूयॉर्कच्या अडेल्फी विद्यापीठात इंग्रजीचे शिक्षण घेण्यासाठी आले. त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले. एक दिवस चीज निर्मिती करणाऱ्या आपल्या छोट्याशा कार्यालयात ते बसले होते. वृत्तपत्रात एक जाहिरात पाहिली. 
 
एक योगर्ट प्रकल्प विक्रीस होता. उल्कायाने तो कागद कचरापेटीत टाकला. एक तासाने पुन्हा तो कागद काढला. एक तासाच्या अंतरावर तो प्रकल्प होता. दुसऱ्या दिवशी तेथे भेट दिली. ९० वर्षे जुना प्रकल्प होता. ५०-६० कर्मचारी तेथे काम करत होते. व्यवस्थापकाने त्यांना प्रकल्प दाखवला. भंगाराच्या भावात हा प्रकल्प विक्रीस होता. उल्कायांना तो खरेदी करण्याची मनापासून इच्छा झाली. त्यांच्या सल्लागाराने त्यांना खरेदी न करण्याचा स्पष्ट इशाराच दिला. 
 
उल्काया सांगतात, दही निर्मितीचा विचार बऱ्याच काळापासून मनात घोळत होता. अमेरिकेत चांगले दही मिळत नाही याचा मला अनुभव होता. त्या वेळी माझ्याकडे घरही नव्हते. छोटासा चीज निर्मितीचा बिझनेस नफ्यात नव्हता. मी बिझनेसची योजना तयार केली. कर्ज काढून २००५ मध्ये प्रकल्प खरेदी केला.
 
 ५ लोकांसह प्रकल्प हाती घेतला. पहिल्या बैठकीत उल्काया आणि हे ५ सदस्य होते. या आजारी प्रकल्पाचे दुरुस्तीकाम सुरू केले. स्वत: ५ सदस्यांसह येथे रंगरंगोटी केली. पुढचे १८ महिने दही निर्मितीची योग्य प्रक्रिया शोधण्यासाठी गेले. यासाठी एक निष्णात खानसामा तुर्कीहून आणला. 
तुर्कीत असताना त्यांना दररोज दही लागे. २००७ मध्ये पहिली ऑर्डर मिळाली. मागणी वाढल्यावर मनुष्यबळ वाढवले. कंपनीने बाजारात वेगाने वर्चस्व प्रस्थापित केले. इतर कंपन्यांनादेखील तुर्की पद्धतीचे दही बाजारात उतरवणे भाग पडले.  

उद्योगाचा व्याप वाढला.
 त्यांना लोकांची कमतरता भासू लागली. कर्मचारी मिळवण्यासाठी  ते निर्वासितांच्या छावणीत गेले. शरणार्थींना काम दिले. २०१५ मध्ये उल्काया यांनी आपल्या संपत्तीचा बहुतांश हिस्सा गिव्हिंग प्लेजरद्वारे दान करण्याची घोषणा केली. कर्ज काढून सुरू केलेल्या या कंपनीचा व्याप ५ वर्षांत १ अब्ज डॉलर्सच्या वर गेला.
 
 २०१६ मध्ये उल्काया यांनी दही बनवण्याचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प अमेरिकेच्या आइडाहो येथे सुरू केला. १० लाख चौरस फुटात हा प्रकल्प विकसित केला आहे. याच्या उभारणीस ११ महिन्यांचा अवधी लागला. या प्रकल्पावर शरणार्थींना नोकरी दिली. 
 
येथे इराक, अफगाणिस्तान, तुर्कीसारख्या देशांतून आलेले शरणार्थी काम करतात. या लोकांना कंपनीने इंग्रजीचे प्रशिक्षण दिले. ११ भाषांतील दुभाषी आणि भाषांतरकार येथे काम करतात. छोट्या संकल्पनेवर मूलभूत काम करत त्यांनी जगभरात ख्याती मिळवली. 
 
- २००७ मध्ये सुरू झालेल्या कंपनीची उलाढाल केवळ ५ वर्षांत १ अब्ज डॉलर्सच्या वर गेली.  
- ८ लाख डॉलर्स गुंतवून सुरू केली होती कंपनी.
- जगातील सर्वात मोठा योगर्ट प्रकल्प १० लाख चौरस फूट परिसरात उभारला आहे. 
बातम्या आणखी आहेत...