आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे ते गुप्त शहर, जेथे तयार होतात सीक्रेट वेपन्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकन लष्कराच्या हालचाली पाहता उत्तर कोरियाने सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारी माध्यमांनी उत्तर कोरियातील शस्त्रास्त्र आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांवर एक अहवाल जारी केला. त्यानुसार, उत्तर कोरिया आपल्या प्रकल्पांचे हॅमहुंग या गुप्त शहरात स्थलांतरित करत आहे. या शहरातील विविध कारखान्यांमध्ये प्रॉडक्ट्सची नावे वेग-वेगळी असली तरी प्रत्यक्षात तेथे युद्धाची साहित्ये बनवली जातात. अनेक कारखान्यांमध्ये क्षेपणास्त्र आणि आंतरखंडीय मिसाइलला लागणारे इंधन प्रोसेस केले जात आहे. त्यामुळे, शेजारील शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियात हॅमह्युंग शहराची जोरदार चर्चा सुरू आहे. 
 

कोरियन युद्धात उद्ध्वस्त झाले होते शहर
>> उत्तर कोरियावर नजर ठेवणाऱ्या दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकन संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, क्षेपणास्त्रांमध्ये प्रामुख्याने यूडीएमएच असे विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते. त्या इंधनाची प्रोसेसिंग हॅमहुंग शहरात केली जात आहे. 

>> या व्यतिरिक्त आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या याच शहरातून केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शहरात लष्करी हालचालींना वेग आला आहे. 

>> उत्तर कोरियातील हँगयोंग प्रांताची राजधानी हॅमहुंग उत्तर कोरियातील सर्वात मोठ्या औद्योगिक शहरांपैकी एक आहे. 7.5 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात मोठ्या संख्येने कापड कारखाने आहेत. 

>> 1950 च्या दशकात झालेल्या कोरियन युद्धात अमेरिका आणि दक्षिण कोरियाने या शहरावर जोरदार हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमध्ये शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. शहरातील 80 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता. शहराची त्या वेळची अवस्था पाहून येथे पुन्हा नागरी वस्ती होईल असा कुणी विचारही केला नव्हता. 

>> मात्र, युद्धानंतर या शहरातील जमीनीत दबलेले काळे सोने अर्थात कोळशाने शहराला पुन्हा सुगीचे दिवस आणले. 

>> 1990 च्या दशकात आलेल्या दुष्काळाने अनेक स्थानिकांनी शहरातून स्थलांतर केले. यानंतरही शहर पुन्हा सावरला. आज या शहरात टेक्सटाईल, मेटलवेअर, मशीनरी, ऑइल इंडस्ट्री आणि केमिकलसह असंख्य कारखाने आहेत. 

>> मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजीचे प्राध्यापक विपिन नारंग यांच्या अहवालानुसार, उत्तर कोरिया याच शहरातील कारखान्यांमध्ये गुप्तरीत्या रॉकेट फ्यूल आणि मिसाईल फ्यूल तयार करत आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या शहरातील आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...