आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Animals नव्हे Handimals पाहा काही भन्नाट कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलेला कशाचेही बंधन नसते असे म्हटले जाते. कलाकाराची कल्पनाशक्ती जेवढी अफाट असेल, तेवढीच त्या कलाकाराची कलाही प्रगल्भ जाणवू लागते. त्यात पेंटिंगच्या जगतामध्ये एकापेक्षा एक सरस कलाकांरांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पण पारंपरिक पद्धतीने कागद किंवा कॅनव्हासवर पेंटिंग करण्याबरोबरच सध्या बॉडी पेंटिंगचा चांगलाच ट्रेंड सुरू झाला आहे.
शरिरावर कलाकारी दाखवणारे हे कलाकार रंग आणि शरिराचा आकार याचा वापर करून आपली कलाकृती तयार करत असतात. त्यातही आणखी पुढे जाऊन शरिराच्या विशिष्ट भागाचा वापर करून पेंटिंग करण्याचा ट्रेंडही आहे. त्यात सर्वाधित वापर केला जातो तो हातांचा. हातांवर विविध रंगांची उधळण करत, प्राणी, व्यक्ती किंवा निसर्गाचे रुप तयार करण्याचे सामर्थ्य या कलाकारांनी दाखवले आहे. यामाध्यमातून आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही अवलिया कलाकारांची ओळख करून देणार आहोत. या मालिकेत सर्वात आधी ओळख करुन घेऊयात गुडो डॅनियल यांची.

गुडो यांचा हातखंडा हाताच्या सहाय्याने प्राणी साकारण्यामध्ये आहे. त्याला ते हँडीमल्स "Handimals" असेही म्हणतात. 2002 पासून त्यांनी अशा प्रकारचे काम करायला सुरुवात केली आहे. याबरोबरच ते बॉडी पेंटिंगचीही अनेक कामे करतात. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या हाताच्या अनेक कलाकृतींमागे गुडो यांचाच हात असतो. आपल्या कलाकृतींची अने प्रदर्शनेही ते भरवत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गुडो यांच्या काही कलाकृतींचे PHOTOS