आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातांच्या प्रत्यारोपणामुळे ‘जियोन’ला गगन ठेंगणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - सतत ११ तासांची शस्त्रक्रिया, त्यापाठोपाठ प्रदीर्घ बेशुद्धावस्था. त्यानंतर जियोनच्या चेह-यावर उमटलेला आनंद. अश्रू नव्हते, काही तक्रारही नव्हती. डॉ. स्कॉट लेव्हीन सांगत होते. जियोनवर दोन हातांच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनीच पूर्ण केली आहे.
अमेरिकेत प्रत्यारोपण झालेला जियोन हा सर्वात कमी वयाचा व्यक्ती ठरला आहे. ताे दोन वर्षांचा होता त्या वेळी त्याला गँगरिनमुळे गंभीर संसर्ग झाला होता. गंभीर संसर्गामुळे त्याचे हात आणि पाय कापावे लागले होते. चार वर्षांचा असताना त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली होती.

आई कॅटीने त्याला आपली किडनी दिली होती. बाल्टीमोरचे हे कुटुंब. फ‍िलाडेल्फिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. जूनमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेला आतापर्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. मंगळवारी डॉक्टर्सनी याबाबतची माहिती जाहीर केली.

कमी वयात जियोनला मोठ्या संघर्षाचा मुकाबला करावा लागला. संघर्षाचा सामना करण्यासाठी त्याला आईने बळ दिले. त्याला प्रोस्थेटिक पाय लावण्यात आले आहेत. जेणेकरून त्याला चालणे शक्य होऊ शकेल; परंतु तिला आपल्या मुलासाठी बरेच काही करायचे होते. म्हणूनच तिने प्रोस्थेटिक हात लावण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. ४० अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने ही शस्त्रक्रिया पार पाडली.