आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात आनंदी शहर बनवण्यासाठी दुबईत लावले हॅपिनेस मीटर, लोक व्यक्त करताहेत आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- यूएईने हॅपिनेस मंत्रालय सुरू केल्यानंतर आता दुबईला जगातील सर्वात आनंदी शहर बनवण्याची तयारी केली आहे. येथील लोक किती प्रमाणात आनंदी आहेत हे कळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी टच पॉइंट्स लावले आहेत. यावर शहर व बाहेरून आलेले नागरिक अभिप्राय नोंदवतात. प्रत्येक मीटरवर तीन पॉइंट्स आहेत. त्यात पहिला आनंदी चेहरा, नैसर्गिक चेहरा व तिसरा दु:खी चेहरा आहे. यावर कुणीही आपल्या स्थितीनुसार क्रमवारी देऊ शकतो. यामध्ये हॅपिनेस फेसची एकूण संख्या किती आहे त्यावरून दरवर्षी शहराचा हॅपिनेस स्कोअर जारी केला जाईल.  

हॅपिनेस मंत्रालयाद्वारे शहरात हे मीटर्स लावले जात आहेत. लोकांचा दररोज आनंदाचा अनुभव जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश आहे. स्मार्ट  दुबईच्या संचालक  डॉ. आयशा बिन बिशर म्हणाल्या, आम्ही दुबईला जगातील सर्वात आनंदी शहर बनवू इच्छितो. त्यामुळे हॅपिनेस मीटर लावले आहेत. आम्हाला शहरातील लोकांचे मत जाणून घ्यावयाचे आहे. यातून शहरात मिळणाऱ्या सुविधांबाबत लोक किती समाधानी आहेत ते कळेल. आतापर्यंत ६० लाख नागरिकांनी हॅपिनेस मीटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात ९० % नागरिक आनंदी असल्याचे दिसले. दुबईचा हॅपिनेस निर्देशांक २०२१ पर्यंत ९५ % पर्यंत नेण्याचा आमचा उद्देश आहे. लोक आनंदी झाल्यावर शहर आपोआप आनंदी होईल. यासोबत त्यांच्यात सकारात्मक भावनाही निर्माण होईल. 

दुबईला आनंदी बनवण्यासाठी जवळपास ५५ प्रकारच्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी सेन्सरयुक्त कचराकुंडी लावली आहे. ती भरल्यानंतर अलर्ट पाठवला जातो. याशिवाय ‘दुबई नाऊ’ नावाचे अॅप बनवण्यात आले आहे. याच्या माध्यमातून नागरिक बिल आणि दंड भरू शकतील. यूएईच्या पहिल्या हॅपिनेस मंत्री ओहुद अल रोउमी यांनी गेल्या वर्षी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी सर्व मंत्रालयांमध्ये ६० हॅपिनेस सीईओंची नियुक्ती केली. लोकांचे दैनंदिन जीवन सुखकर करणे आणि आनंदाला प्रोत्साहन देणे हे त्यांचे काम आहे. जास्तीत जास्त लोकांनी व्यायाम करावा यासाठी मंत्रालय देशात हॅपिनेस पार्क विकसित करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...