आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी फेसची इमोजी लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडमधील स्विफ्टकी नामक कंपनीने जगातील इमोजींची लोकप्रियता तपासली. या कंपनीने विविध देशांत कोणत्या इमोजींचा जास्त वापर होतो याचा सर्व्हे केला. कॅनडात पूप, तर अमेरिकेत पिझ्झा इमोजी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्कल इमोजीही अमेरिकनांची अव्वल पसंती आहे. फ्रेंच लोक सर्वाधिक हार्टशेप इमोजीला प्राधान्य देतात. विविध १६ भाषिकांच्या मोबाइल इमोजींचे विश्लेषण या अध्ययनात करण्यात आले. यासाठी १ अब्ज मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली. ७० % इमोजी सकारात्मक - मोबाइल वापरकर्ते ७० % सकारात्मक इमोजींची देवाण-घेवाण करत असल्याचे या पाहणीत दिसून आले. हॅपी फेस सर्वाधिक शेअर होणारे संकेतचिन्ह आहे. एकूण इमोजी वापरात ४४.८ % वापर हॅपी फेसचा होतो. कॅनडात इमोजीचा सर्वाधिक वापर होतो. फ्रान्समध्ये मोबाइल संभाषणात संकेताच्या वापरापैकी ५५ % संकेतचिन्हे हार्टशेपची असतात.

अरब भाषिकांत फुलांचे सर्वाधिक शेअरिंग
अरब भाषिक सर्वाधिक फुलांचे व पानांचे चिन्ह शेअर करतात. रशियन स्मार्टफोनधारक सर्वाधिक रोमँटिक संकेतचिन्ह शेअर करतात. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक सर्वाधिक मद्यपानाचे इमोजी पाठवतात. मादक पदार्थ आणि जंक फूडच्या इमोजींचे प्रमाणही ऑस्ट्रेलियात सर्वाधिक आहे. अमेरिकनांच्या इमोजीमध्ये बर्थडे केक, स्कल्स, फायर, पिझ्झा, गॅजेट, मांसाहाराची वारंवारता अधिक आहे.