आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाढी-मिश्‍यावाल्या तरुणीने नोंदवला विश्‍वविक्रम, वाचा तिचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश शीख मॉडलने गेल्या गुरुवारी (ता. आठ ) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये आपला विक्रम नोंदवला. दाढी-मिशा असलेल्या या 24 वर्षांच्या तरुणीचे नाव हरनाम कौर असे आहे. ती इंग्लंडमधील बर्कशायर शहरात राहते. हरनाम पॉलिसी ओव्हरी सिंड्रोम नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या आजारात पुरुष संप्रेरक (मेल हार्मोन) प्रमाणापेक्षा जास्त निर्माण झाल्याने स्त्रियांना दाढी व मिशा येतात.
आजारामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे तिने सांगितले. घरातून बाहेर पडल्यावर तिला लोक विचित्र नजरेतून पाहायचे. ऊठसूठ कोणीही तिला दाढी व मिश्‍या काढण्‍याचा सल्ला देत. पण तिने आपले आजारपणा धाडसाने तोंड दिले. शीख धर्माचे पालन करण्‍यासाठी तिने दाढीमिश्‍या राखण्‍याचा निर्णय घेतला. यामुळे हरनामची जगात एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा तिचे छायाचित्रे...