आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत आणखी एका भारतीयाची हत्या, व्यापारी पटेल यांना घराजवळ घातल्या गोळ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - वंशभेदीहल्ल्यात एका भारतीय अभियंत्याच्या हत्येला आठ दिवसही उलटत नाहीत तोवर अमेरिकेत व्यापारी असलेल्या आणखी एका भारतीयाची हत्या झाली. हरनिश पटेल यांना त्यांच्या घराजवळच गोळ्या घालण्यात आल्या. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकान बंद करून पटेल घरी परतले. मात्र, ते घराजवळ काही फुटांवर असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून एका महिलेने पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत पटेल यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला असला तरी अद्याप कोणतेही धागेदोरे हाती आलेले नाहीत. पोलिसांनी प्राथमिक टप्प्यात हा हल्ला वंशभेदातून झाला असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पटेल यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा आहे. २२ फेब्रुवारी रोजी कॅन्ससमध्ये भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोटला यांची दहशतवादी असे संबोधून हत्या करण्यात आली होती. नौदलाच्या एका निवृत्त सैनिकाने त्यांना गोळ्या घातल्या होत्या. दरम्यान, आठ दिवसांत दोन भारतीयांच्या हत्या झाल्यामुळे अमेरिकी भारतीय तणावात असून त्यांनी या हल्ल्यांबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे. 
 
भारतीयांत दहशत : दरम्यान,आठ दिवसांत दोन भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेतील भारतीय वंशाचे व्यापारी विविध क्षेत्रात कार्यरत लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून या प्रकरणी भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव जयशंकर यांंनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. 
 
२२ फेब्रुवारीला झाली होती एका अभियंत्याची हत्या...
- ही घटना 22 फेब्रुवारीची आहे. श्रीनिवास कुचीभोतला आणि आलोक मदसानी हे दोघे ओलाथेमधील जीपीएस निर्माता कंपनी गार्मिनमध्ये एव्हिएशन विंगमध्ये काम करत होते.
- दोन्ही एका बारमध्ये बसले होते. तितक्यात अॅडम पुरिन्टन नामक व्यक्तीसोबत त्यांची शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. तो अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता. इतकेच नाही तर त्याने श्रीनिवास आणि आलोकला दहशतवादी संबोधले. 'माझ्या देशातून चालते व्हा', असेही तो म्हणाला. 
- बारमधून त्याला बाहेर काढण्यात आले. नंतर अॅडम पुन्हा आला. त्याने पिस्तूलमधून दोघांनावर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी श्रीनिवास याला लागली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर आलोक मदसानी हा जखमी झाला होता.
- पोलिसांनी अॅडम पुरिन्टन याला अटक केली आहे. तो यूएस नेव्हीतील माजी अधिकारी आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अमेरिकेत वर्णभेदातून झाली हर्निश पटेल यांची हत्या... संबंधित फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...