आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: हॅरी पाॅटर मुखोद्गत, प्रत्येकच घटना स्मरणात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबोर्न - जगभरात धूम उडवणाऱ्या जे.के. राेलिंग या लेखिकेच्या ‘हॅरी पाॅटर’ पुस्तकांतील अनेक प्रसंग व कथा अनेकांना माहीत असतील. पण ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय रिबेका शॅरॉकला या कथामालिकेतील सर्व सात पुस्तकांतील शब्दन्््शब्द मुखोदग््त आहे. इतकेच नव्हे तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग तिला आठवतो.
वयाच्या बाराव्या वर्षी घटलेल्या घटनाही रिबेकाला लख्ख आठवतात. पण केवळ छंदापोटी नव्हे तर एका दुर्मिळ आजारामुळे रिबेकाला ही अद््भुत स्मरणशक्ती लाभली आहे. शॅरॉकच्या मुलाखतीचा एक ६० मिनिटांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्यात तिला हॅरी पॉटर मालिकेतील पहिले पुस्तक ‘द फिलासॉफर्स स्टोन’च्या १७ व्या चॅप्टरची कथा ऐकवण्यास सांगितले जाते. एक क्षणभर थांबल्यानंतर ती १७ वा चॅप्टर धडाधडा म्हणून दाखवते. रिबेका म्हणाली, २०११ पर्यंत तिला एचसॅम किंवा हायपरथायमेसिया या आजाराबद्दल काहीही माहीत नव्हते. तिची आई जेनेट बार्न्स यांनी एचसॅमग्रस्तांवर करण्यात आलेल्या संशोधनाची माहिती असलेल्या ‘सिक्स्टी मिनिट्स’ मालिकेचा एक भाग पाहिला. त्यानंतर त्यांनी रिबेकाला त्याची माहिती दिली. पौगंडावस्थेत रिबेकावर ऑटिझम व ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डरचे उपचार झाले आहेत. त्यामुळे तिला स्मरणशक्तीबाबत एखादा आजार जडला असेल, असे वाटायचे, असे जेनेट म्हणाल्या.

सर्वात जुनी आठवण : रिबेका १२ वर्षांची असताना आईने तिचा कारमध्ये बसवून चालकासारखा फोटो काढला होता, हीच रिबेकाची सर्वात जुनी आठवण आहे. त्या अाधीचे मात्र तिला काही आठवत नाही.

एचसॅम आजाराचे वरदान ....
रिबेकाला हायली सुपिरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी (एचसॅम) अाजार आहे. जगात केवळ ८० लोकांनाच हा आजार आहे. यात व्यक्तीला तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटना अनेक वर्षांनंतरही आठवतात. आजाराची सुरुवात आयुष्यातील एखादी घटना वा अनुभवापासून होते.
अन् शापही : लहानपणी रिबेकाची आई तिला हॅरी पॉटरच्या गोष्टी सांगण्यास सांगायची. रात्री झोपण्यासाठीही तिला रेडिओ व मंद प्रकाशाचा सहारा घ्यावा लागायचा. कारण अंधारात झोपायचा प्रयत्न केला की तिला जुन्या गोष्टी आठवायच्या.
बातम्या आणखी आहेत...