आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वे’चा टेक्सासला तडाखा, मृतांची संख्या 50; 42 हजार लोक तात्पुरत्या निवाऱ्याखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन-अमेरिकेतील टेक्सासला हार्वे चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. वादळामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत ५० जणांना प्राण गमावावे लागले. वादळात १ लाख ८५ हजार घरांची पडझड झाली आहे. सुमारे ४२ हजार लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले आहे.
 
 
टेक्सासमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक शहरात पाणीच पाणी झाले आहे. शुद्ध पाण्याअभावी सामान्य नागरिक बेहाल झाले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यातून मृतांची संख्या ५० वर पोहोचली आहे. ह्युस्टनमधील मुख्य दोन विमानतळांचा कारभारदेखील ठप्प झाला आहे. शहरातील सुमारे ३७ हजार घरे अद्यापही अंधारात आहेत. 
 

असंख्य घरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय पाहायला मिळू लागली आहे. दरम्यान, सरकारने पूरग्रस्तांना सुमारे ३ कोटी ६० लाख डॉलरच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे चक्रीवादळ ठरले आहे. वादळामुळे अमेरिकेत सर्व प्रकारची हानी झाली आहे. मला हे ऐकून धक्का बसला आहे. अनेकांंवर जिवलग गमावण्याची वेळ आली आहे. हजारो बेघर झाले आहेत. अशा प्रसंगी ब्रिटनची जनता तुमच्या सोबत असल्याची भावना ब्रिटिश राजघराण्याच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी व्यक्त केल्या आहेत.  टेक्सासमधील वादळानंतर वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. 
बातम्या आणखी आहेत...