आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हार्वे चक्रीवादळामुळे हाहाकार, फोटोजमधून पाहा तेथे कशी आहे परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्कासचे एयरपोर्ट असे पाण्यात गेले आहे. - Divya Marathi
टेक्कासचे एयरपोर्ट असे पाण्यात गेले आहे.
टेक्सास- अमेरिकेत हार्वे चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. हे 12 वर्षांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. त्यामुळे टेक्सास आणि ह्यूस्टनमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर बोटी आहेत. शेकडो इमारती पडल्या आहेत. लाखों घरांची वीज गायब आहे. हजारो लोक छतांवर रात्र काढत आहेत. ह्यूस्टनमध्ये पाच लोकांच्या मृत्यूचे वृत्त आहे. हवामान विभागानुसार, दोन दिवसांत टेक्सास शहरात 11 ट्रिलियन गॅलन (41 लाख कोटी लि.) पाऊस झाला. कॅलिफोर्नियात 2015 ला आलेला भीषण दुष्काळ संपवण्याएवढे हे पाणी आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे की, ह्यूस्टन विद्यापीठ परिसरात 200 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. चक्रीवादळात जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवले हार्वे....
 
- हार्वे चक्रीवादळाच्या वेळी कॉर्पस क्रिस्टी शहरात जन्मलेल्या मुलाचे नाव हार्वे ठेवण्यात आले आहे. हार्वेचे वजन 3 पौंड, उंची 18 इंच आहे. 
- आई राड्रिगुएज म्हणाली की, चक्रीवादळाच्या वेळी मुलगा झाल्याने मी आनंदी आहे. नर्सच्या सूचनेनुसार त्याचे नाव ठेवले आहे. 
 
1000 उड्डाणे रद्द; 30 हजार कोटी रु. चे नुकसान-
 
- हार्वेमुळे टेक्सास आणि ह्यूस्टनचा इतर शहरांशी संपर्क तुटला आहे. द
- दहा हजार लोकांना रेस्क्यू केले आहे तर तीस हजार लोकांना अस्थायी शेल्टरची गरज आहे.
- एक हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. 30 हजार कोटी रु. चे नुकसान झाले आहे. 
- ह्यूस्टन शहराच्या 10 हजार लोकांना वाचवण्यात आले आहे. सुमारे 30 हजार अस्थायी निवाऱ्यांची गरज आहे. 
- 41 लाख कोटी लिटर पाणी 64 घन किमी जागा व्यापेल. एवढ्या पाण्याने अमेरिकेचा सर्वात मोठा आणि जगातील वा मोठा ग्रेट साल्ट तलाव दोन वेळा भरेल. 
- कॅलिफोर्नियाचा शतकातील सर्वात भीषण दुष्काळ (2015 चा) या पाण्यामुळे संपेल. 
- टेक्सासमध्ये 48 तासांत 41 लाख कोटी लिटर पाऊस; हे पाणी कॅलिफोर्नियात शतकातील भीषण दुष्काळ संपेल एवढे आहे.
 
पावसाचा 40 वर्षांचा विक्रम मोडेल-
 
टेक्सासआणि ह्यूस्टनमध्ये काही ठिकाणी 50 इंच पाऊस झाला. आतापर्यंत सरासरी 30 इंच पाऊस झाला . दोन-तीन दिवसांत 23 इंच पावसाची शक्यता. तसे झाल्यास 40 वर्षांचा विक्रम मोडेल. 1978 मध्ये एलिसन वादळामुळे 50 इंच पाऊस झाला होता.
 
2500 अणुभट्ट्यांएवढी ऊर्जा-
 
- हार्वे चक्रीवादळाची तुलना 2500 अणुभट्ट्यांतून निघणाऱ्या विजेशी केली जाऊ शकते. माध्यमांनी त्याला महापूर संबोधले आहे. 
- 2005 मध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाएवढे नुकसान झाले आहे. कॅटरिनाच्या वेळी 1800 बळी गेले होते. 
 
सुषमांनी ट्विट करून भारतीयांना दिली माहिती -
 
- भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितले की, ह्यूस्टन विद्यापीठ परिसरात पाणी साचले आहे.
- तेथे 200 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. शालिनी आणि निखिल भाटिया या दोन विद्यार्थ्यांना आयसीयूत दाखल करावे लागले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, हार्वे चक्रीवादळामुळे अमेरिकेत कसा माजला आहे हाहाकार...
 
बातम्या आणखी आहेत...