आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रोड्युसरने केले असंख्य हॉलिवुड अभिनेत्रींची लैंगिक शोषण, अशी वाचली ऐश्वर्या राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हॉलिवुडच्या सर्वात मोठ्या प्रोड्युसर्सपैकी एक हार्वे वीनस्टीन कास्टिंग काऊच आणि लैंगिक अत्याचारांमुळे जगभर कुप्रसिद्ध झाला. हॉलिवुडच्या ए लिस्ट अभिनेत्री एंजेलिना जोली, ग्विनेथ पॅल्ट्रोसह अनेकी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे आल्या. लैंगिक अत्याचार विरोधात सोशल मीडियावर सुरू झालेल्या MeToo कॅम्पेनमध्ये सर्वात जास्त गाजला तो हा निर्माता. ऐश्वर्या राय सुद्धा या नराधमाच्या तावडीतून बालंबाल बचावली आहे. आता या सोशल मीडिया कॅम्पेनला टाइम पर्सन ऑफ द इयर ठरवण्यात आले आहे. सोशल मीडियावर येताच या कॅम्पेनमुळे फेसबूकवर सव्वा कोटी आणि ट्विटरवर 50 लाख महिला व्यक्त झाल्या. तसेच त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीगत साऱ्या जगासमोर मांडली. 


अशी बचावली ऐश्वर्या राय
>> ऐश्वर्या रायची माजी टॅलेन्ट मॅनेजर असल्याचा दावा करणाऱ्या सिमोन शेफील्ड हिने सांगितल्याप्रमाणे, तिने ऐश्वर्या रायला हार्वे वीनस्टीनपासून वाचवले आहे. 
>> फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार शेफील्ड म्हणाली, "त्यावेळी मी ऐश्वर्या रायची मॅनेजर होते. हॉलिवुड इवेन्टमध्ये हार्वे वीनस्टीन कुठल्याही परिस्थितीत ऐश्वर्याला एकटे भेटण्यासाठी धडपड करत होता. कितीही समजावून सांगितले तरी तो अगदी डुकराप्रमाणे वागत होता. 
>> ऐश्वर्या, मी आणि तो चर्चेसाठी बसलेले असताना त्याने वेळोवेळी मला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, प्रत्येकवेळा अगदी विनम्रपणे मी बाहेर जाण्यास नकार दिला."
>> चर्चेच्या शेवटपर्यंत मी तेथेच बसलेले होते. चर्चा झाल्यानंतर आम्ही हॉटेलला परतलो. आणि धन्यवाद म्हणून मी त्याला डुकराच्या शेपच्या छोट्याशा शोपीसमध्ये डायट कोक टाकून पाठवले. यानंतर वीनस्टीनने तिला या प्रोफेशनमध्ये टिकू देणार नसल्याच्या धमक्या दिल्या होत्या.

 

पुढे, अॅन्जेलिना जोली, बॉन्ड गर्ल एव्हा ग्रीनसह या अभिनेत्रींनी वीनस्टीनवर काय म्हटले...

बातम्या आणखी आहेत...