आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंजेलिना जोलीसह असंख्य हॉलिवुड अभिनेत्रींवर अत्याचार, अशी बचावली ऐश्वर्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - हॉलिवुडच्या सर्वात मोठ्या प्रोड्युसर्सपैकी एक हार्वे वीनस्टीन सेक्स स्कॅन्डलमुळे अडकला आहे. हॉलिवुडच्या ए लिस्ट अभिनेत्री एंजेलिना जोली, ग्विनेथ पॅल्ट्रोसह अनेक अभिनेत्री त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळेच, BAFTA आणि OSCARS बोर्डांनी वीनस्टीनवर बंदी लावली आहे. या प्रोड्युसरने कथितरीत्या ऐश्वर्या रायवर सुद्धा वाइट नजर टाकली होती. 
 

अशी बचावली ऐश्वर्या राय
>> ऐश्वर्या रायची माजी टॅलेन्ट मॅनेजर असल्याचा दावा करणाऱ्या सिमोन शेफील्ड हिने सांगितल्याप्रमाणे, तिने ऐश्वर्या रायला हार्वे वीनस्टीनपासून वाचवले आहे. 
>> फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार शेफील्ड म्हणाली, "त्यावेळी मी ऐश्वर्या रायची मॅनेजर होते. हॉलिवुड इवेन्टमध्ये हार्वे वीनस्टीन कुठल्याही परिस्थितीत ऐश्वर्याला एकटे भेटण्यासाठी धडपड करत होता. कितीही समजावून सांगितले तरी तो अगदी डुकराप्रमाणे वागत होता. 
>> ऐश्वर्या, मी आणि तो चर्चेसाठी बसलेले असताना त्याने वेळोवेळी मला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, प्रत्येकवेळा अगदी विनम्रपणे मी बाहेर जाण्यास नकार दिला."
>> चर्चेच्या शेवटपर्यंत मी तेथेच बसलेले होते. चर्चा झाल्यानंतर आम्ही हॉटेलला परतलो. आणि धन्यवाद म्हणून मी त्याला एक स्टीलचे छोट्याशा डुकरात डायट कोक टाकून त्याला पाठवले. यानंतर वीनस्टीनने वेळोवेळी शेफील्ड हिला या प्रोफेशनमध्ये टिकू देणार नसल्याच्या धमक्या दिल्या.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हार्वे वीनस्टीनवर इतर हॉलिवुड अभिनेत्रींनी लावलेले आरोप...
बातम्या आणखी आहेत...