आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न; 10 जणांना फाशी, 9 जणांना 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - २००० मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने रविवारी १० दहशतवाद्यांना फाशीची, तर इतर नऊ जणांना प्रत्येकी २० वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. या वेळी अाराेपींपैकी केवळ अाठ जण उपस्थित हाेते, तर इतरांना त्यांच्या अनुपस्थितीत शिक्षा सुनावण्यात अाली. तथापि,अाराेपींना वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यात अाली अाहे.
 
२००० मध्ये बांगलादेशातील गाेपालगंज गावात एका सार्वजनिक रॅलीला संबाेधित करण्यासाठी आलेल्या शेख हसीना यांची हत्या करण्यासाठी अाराेपींनी जमिनीत स्फाेटके पेरून ठेवली हाेती. सुरक्षा अधिकाऱ्यांना रॅलीपासून काही अंतरावर एक बाॅम्ब अाढळून अाला हाेता. या घटनेत सुदैवाने हसीना बचावल्या हाेत्या.
बातम्या आणखी आहेत...